फोंडा : ट्रकमालकांचे आंदोलन सुरू झाल्यापासून आपण सातत्याने या आंदोलनाचा आढावा घेत आहे. भाजपा सरकारला खाण कंपन्यांचे नव्हे तर ट्रकमालकांचे आणि खाण अवलंबितांचे हित सांभाळायचे आहे. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी खास बैठकीत ट्रकमालकांच्या समस्येवर विचारविनिमय करून रास्त तोडगा काढला जाईल. येत्या दोन दिवसांत ट्रकमालकांची समस्या सोडवली जाईल, असे आश्वासन भाजपा प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी वडाकडे-उसगाव येथे आंदोलक ट्रकमालकांना गुरुवारी दिले. या वेळी त्यांच्यासोबत साखळीचे आमदार डॉ. प्रमोद सावंत, सत्यविजय नाईक, नीळकंठ गावस व मोठ्या संख्येने ट्रकमालक उपस्थित होते. अखिल गोवा ट्रकमालक संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाला गुरुवारी चौदाव्या दिवशी राजकीय आखाड्याचे (पान ७ वर)
आंदोलनाचा झाला राजकीय आखाडा
By admin | Updated: December 18, 2015 01:53 IST