शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात चार भिंती आड होवू लागली ड्रग्सची निर्मिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2018 10:21 IST

नेपाळ तसेच उत्तर भारतातील राज्यांतून गोव्यात येणारे अमली पदार्थ आता गोव्यातच चार भिंती आड किनाऱ्यालगत तयार होवू लागले आहेत.

ठळक मुद्देनेपाळ तसेच उत्तर भारतातील राज्यांतून गोव्यात येणारे अमली पदार्थ आता गोव्यातच चार भिंती आड किनाऱ्यालगत तयार होवू लागले आहेत. . मागील सहा महिन्यांत अशा प्रकारची तीन प्रकरणे पोलिसांनी केलेल्या कारवाईत उघडकीस आली आहेत. पोलिसांनी केलेल्या कारवाईत पाच विदेशी नागरिकांना अटक केली आहे.

म्हापसा - नेपाळ तसेच उत्तर भारतातील राज्यांतून गोव्यात येणारे अमली पदार्थ आता गोव्यातच चार भिंती आड किनाऱ्यालगत तयार होवू लागले आहेत. मागील सहा महिन्यांत अशा प्रकारची तीन प्रकरणे पोलिसांनी केलेल्या कारवाईत उघडकीस आली आहेत. पोलिसांनी केलेल्या कारवाईत पाच विदेशी नागरिकांना अटक केली आहे. त्यातील चार जण रशियन नागरिक आहेत.  

काही वर्षांपूर्वी गोव्यात येणारे अधिक तर अमली पदार्थ उत्तर भारतातील राज्यातून किंवा नेपाळातून आणला जायचे. त्यातून जास्त प्रमाणावर उत्तर भारतीय पकडले जायचे. पोलिसांनी केलेल्या कारवाईतून हे स्पष्ट झाले आहे; पण मागील सहा महिन्यांत तीन अशी प्रकरणे समोर आली आहेत ज्यातून अमली पदार्थाची एक तर लागवड घरातील परसात किंवा घराच्या चार भिंती आडून होवू लागली आहे. यात रसायन युक्त अमली पदार्था सोबत चरस गांजा सारख्या अमली पदार्थाचा त्यात समावेश होतो. 

जुलै महिन्यात पोलिसांनी शिवोली भागात केलेल्या कारवाईत दोन रशियन नागरिकांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून १० लाख रुपये किंमतीचे रसायन युक्त अमली पदार्थासोबत चरस व गांजा ताब्यात घेण्यात आले होते. ते भाड्याने रहात असलेल्या फ्लॅटवर धाड घालून ही कारवाई करण्यात आली होती. लागवड अत्यंत गुप्तपणे करताना बाहेर हा प्रकार उघडकीस येवू यासाठी सर्वतोपरी काळजी त्यांच्याकडून घेण्यात आली होती. पोलिसांकडून बराच काळ त्या घरावर पाळत ठेवल्यानंतर ही कारवाई केलेली. पकडण्यात आलेले हे रशियन नागरिक पर्यटन व्हीजावर सतत गोव्यात यायचे. 

दुसरी अशाच प्रकारची कारवाई हणजूण पोलीस स्थानकाच्या हद्दीत मागील महिन्यात करण्यात आली होती. हणजूण येथे भाड्याच्या घरात राहणाऱ्या एका ऑस्ट्रीयन नागरिकाने त्यात अमली पदार्थाची प्रयोगशाळा सुरु केली होती. प्रयोगशाळेत वेगवेगळ्या प्रकारची रसायने पोलिसांनी केलेल्या कारवाईत सापडली होती. गोव्यात येणाऱ्या विदेशी नागरिकांना हेरून तो अमली पदार्थाची विक्री करायचा. पर्यटन हंगामाला सुरुवात झाली की तो गोव्यात दाखल व्हायचा. अंदाजीत १ कोटीच्या आसपास त्याच्याजवळ अमली पदार्थाचे मोठे घबाड सापडले होते. याच संशयितावर २००८ साली त्याच्या मातृभूमीत अशाच प्रकारचा गुन्हा नोंद करुन त्याना अटक करण्यात आली होती. 

तिसरी कारवाई हणजूण पोलिसांनी दोन दिवसापूर्वी शिवोली परिसरात केली आहे. त्यात दोन रशियन जोडप्याला अटक केली आहे. त्यांनी सुद्धा याच भागात एक फ्लॅट भाड्याने घेवून अमली पदार्थ तयार करण्याचे काम सुरु केले होते. त्यात अमली पदार्थाच्या निर्मितीसाठी लागणारे साहित्य जप्त करताना दोघांकडून सुमारे १५ लाख रुपये किंमतीचा अमली पदार्थ सुद्धा जप्त केला. मागील तीन प्रकरणावरुन गोव्यातही चार भिंती आडून अमली पदार्थाची निर्मिती होण्याचे प्रकार समोर आले आहे. करण्यात आलेल्या तिन्ही कारवाया किनारी भागातून करण्यात आल्या. अशा प्रकारची प्रकरणे म्हणजे गोव्यात बाराही महिने अमली पदार्थ उपलब्ध होण्यामागचे एक कारण असल्याचे मानले जाते. 

टॅग्स :Drugsअमली पदार्थgoaगोवाPoliceपोलिसArrestअटक