शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस कॉन्स्टेबलने घेतला गळफास; बेताळभाटी-सावईवेरे येथील घटनेने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2023 17:40 IST

सकाळी उठल्यानंतर बहिणीच्या निर्दशनास आली घटना

गीतेश वेरेकर, सावईवेरे : फोंडा तालुक्यातील बेताळभाट-सावईवेरे येथील योगेश्वर सुरेश सावंत या ३६ वर्षीय युवा पोलिस कॉन्स्टेबलने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार आज, मंगळवारी सकाळी उघडकीस आला आहे. पोलिस खात्याच्या भारतीय राखीव दलात (आयआरबी) रायबंदर स्थानकात तो सेवा बजावित होता.

पाच वर्षांपूर्वी योगेश्वरचे वडील सुरेश सावंत (मूळ एकोशी-पोंबुर्फा) व आठ महिन्यांपूर्वी आईचा मृत्यू झाला होता. बेताळभाट-सावईवेरे येथील नव्या घरात गेल्या चार वर्षापासून सावंत कुटुंब वास्तव्यास आहे. सध्या तो आपल्या लहान बहिणीसोबत राहत होता. मात्र या घरातील बेडरूममध्येच त्याने गळफास लावून जीवन संपवले. 

सकाळी उठल्यानंतर बहिणीच्या निर्दशनास ही घटना आली. तिने तत्काळ पोलिस स्थानकात माहिती देताच म्हार्दोळचे पोलिस उपनिरीक्षक सुशांत सांगोडकर यांनी धाव घेत घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही. परंतु गेल्या काही दिवसांपासून तो तणावाखाली असल्याची माहिती समोर  येत आहे.

टॅग्स :goaगोवा