शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

...अन् परदेशी पाहुण्याच्या घरात सापडली अमली पदार्थांची प्रयोगशाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2018 17:27 IST

विविध रसायनांसह 1 कोटी किमतीचे अमली पदार्थ जप्त

म्हापसा : हणजूण पोलिसांनी केलेल्या कारवाईत येथे चालू असलेली अमली पदार्थाची प्रयोगशाळा उद्ध्वस्त केली. या धाडीत विविध प्रकारच्या रसायनासह अंदाजे १ कोटी ३ लाख किंमतीचा अमली पदार्थ जप्त केला. हणजूण पोलिसांनी यंदाच्या पर्यटन हंगामातील पहिली व हणजूण पोलिसांच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई आहे. हणजूण येथील स्टारको जंक्शनजवळ अमली पदार्थाची विक्री होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर हणजूण पोलीस निरीक्षक चेतन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विदेश पिळगावकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी २६ नोव्हेंबरच्या सायंकाळी ५ वाजता सापळा रचला असता, कोलेर ख्रिस्तीना (३५) हा ऑस्ट्रियन नागरिक संशयीतरित्या फिरताना सापडला. त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे एमडीएमए, डीजीएल, चरस, कॅटामाईन, अ‍ॅफ्टामाईन असे एकूण तीन लाख दहा हजार रुपयांचे अमली पदार्थ सापडले. कोलेर ख्रिस्तीनाला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याच्या माझलवाडो-हणजूण येथील भाड्याच्या घराची झडती घेतली. याठिकाणी पोलिसांना अमली पदार्थ तयार करण्याची रासायनिक प्रयोगशाळा असल्याचे आढळले. त्या ठिकाणी विषासह एकवीस प्रकारची विविध रसायने व अमली पदार्थाचा कच्चा माल सापडला. त्या सर्वांची किंमत १ कोटी असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिसांना त्या घरातून दोन फ्रिज, रासायनिक प्रयोगशाळेसाठी लागणारे सर्व सामान सापडले. पोलिसांनी सर्व सामान ताब्यात घेऊन संशयित कोलेर याचे विरूद्ध अमली पदार्थ विरोधी कायद्याखाली अटक केली आहे. निरीक्षक चेतन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विदेश पिळगावकर पुढील तापस करत आहेत. 

टॅग्स :PoliceपोलिसgoaगोवाDrugsअमली पदार्थ