शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील बीचवर मुलीचा विनयभंग; पुण्यातील ११ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 16:30 IST

बागा बीचवर ही मुलगी तिच्या १७ वर्षीय भावासह बसली होती.

म्हापसा : गोव्यात पर्यटनासाठी आलेल्या पुण्यातील ९ जणांना कळंगुट पोलिसांनी दंगा माजवणे, विनयभंग तसेच दोन अल्पवयीन मुलांना मारहाण करणे अशा विविध आरोपाखाली अटक केली आहे.कळंगुट पोलीस स्थानकाचे निरीक्षक जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री कळंगुट नजीकच्या बागा येथील किनाऱ्यावर ही घटना घडली. घडलेल्या प्रकारासंबंधी त्या अल्पवयीन मुलांच्या मातेने तक्रार केल्यानंतर ही अटक करण्यात आली.संबंधित प्रकरणातील तक्रारदार महिला बागा येथील किनाऱ्यावर असलेल्या शॅकमध्ये बसली होती. तर तिची दोन अल्पवयीन मुले किनाऱ्यावर फिरत होती. त्याचवेळी तेथून जात असलेल्या ११ जणांच्या गटाने त्या मुलांचे मोबाइलवर फोटो काढण्यास सुरुवात केली. आपल्या बहिणीचे फोटो काढत असल्याचे बघून त्या अल्पवयीन मुलीच्या भावाने त्यांना जाब विचारायला सुरुवात केली. त्यावेळी त्या गटातील काही जणांनी त्याला मारहाण करण्यात सुरुवात केली. घडलेल्या घटनेनंतर लागलीच त्या मुलीच्या मातेने घडलेल्या प्रकाराचे कथन कळंगुट पोलीस स्थानकावर जाऊन केले व नंतर त्याची रीतसर तक्रार नोंद केली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ सर्व आरोपांची शोध घ्यायला सुरुवात केली. गोव्यातून पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांना अटक करुन पोलीस स्थानकावर आणण्यात आले व त्यांच्यावर विविध गुन्ह्यांखाली तक्रार नोंद केली. या प्रकरणात गुंतलेल्या ११ जणातील दोघे अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी पणजी नजिक मेरशी येथे असलेल्या अपना घरात करण्यात आली आहे. पुण्यातील मुलांचा हा गट दोन दिवसापूर्वी गोव्यात फिरण्यासाठी आलेला. अटक करण्यात आलेल्यात रमेश कांबळी, संकेत भादले, कृष्णा पाटील, सत्येम लंबे, अनिकेत गुरव, ऋषीकेश गुरव, आकाश सुवास्कर, सनी मोरे व ईश्वर पांगरे यांचा समावेश आहे. तपासादरम्यान पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलांची एनजीओच्या उपस्थितीत जबानी नोंद केली आहे. फोटो काढण्यासाठी वापरण्यात आलेला मोबाइल फोन ताब्यात घेण्यात आला असून चाचणीसाठी तो प्रयोगशाळेत पाठवून देण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक महेश नाईक निरीक्षक जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.  

टॅग्स :goaगोवाMolestationविनयभंग