शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

पीएम विश्वकर्मा योजना कारागिरांना पारंपरिक कलेचे जतन करण्यासाठी प्रोत्साहन देईल: श्रीपाद नाईक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2023 16:18 IST

पर्यटन मंत्रालयाकडून गोव्यामध्ये पीएम विश्वकर्मा योजनेच्या राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन.

नारायण गावस, पणजी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वकर्मा जयंतीच्या निमित्ताने पारंपरिक कारागीर आणि शिल्पकारांसाठी पीएम विश्वकर्मा योजनेचा शुभारंभ केला. या पीएम विश्वकर्मा योजनेमुळे देशातील त्या कारागीरांना आणि शिल्पकारांना प्रोत्साहन मिळेल आणि त्यांचे रक्षण होईल, जे प्रतिकूल परिस्थितीमुळे या पारंपरिक व्यवसायामध्ये काम करण्यासाठी फारसे इच्छुक नाहीत, असे केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने गोव्यामध्ये पणजी येथे आयोजित केलेल्या पीएम विश्वकर्मा योजनेच्या राज्यस्तरीय कार्यक्रमात ते बोलत होते.

ही योजना समावेशकतेवर आधारित आहे, असे त्यांनी सांगितले. “ या पारंपरिक व्यवसायात असलेले कारागीर आणि शिल्पकार काही वेळा हा व्यवसाय पुढे सुरू ठेवण्यासाठी फारसे उत्सुक नसतात. मात्र, पीएम विश्वकर्मा योजना त्यांना हा व्यवसाय पुढे सुरू ठेवण्यासाठी प्रोत्साहित करते. त्याच प्रकारे युवा वर्गाला देखील त्यांच्या पारंपरिक व्यवसायात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देते. त्यांना त्यांच्या व्यवसायासाठी आवश्यक असलेले अर्थसाहाय्य मिळवणे सोपे होते आणि त्यांच्या कौशल्यात वाढ करण्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण मिळवता येते,” अशी माहिती मंत्र्यांनी दिली.कोणत्याही व्यवसायासाठी भांडवलाची सर्वात मोठी आवश्यकता असते असे सांगून पात्र व्यक्तींनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

देशाची सेवा करत असताना पंतप्रधान मोदी अंत्योदयाच्या सिद्धांताचे अनुसरण करत आहेत, असे राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले. पंतप्रधान नेहमीच समाजाच्या उपेक्षित घटकांचा विचार करत असतात. पीएम विश्वकर्मा योजना समाजामध्ये कारागीरांच्या विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी आहे, असे तानावडे म्हणाले. गोव्याचे कृषी, हस्तकला आणि नागरी पुरवठामंत्री रवी नाईक यांनी देखील या कार्यक्रमात आपले विचार व्यक्त केले. यावेळी केंद्रीय आणि राज्य सरकारच्या विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते.

टॅग्स :goaगोवा