शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मोपा विमानतळासाठी झाडे मारण्यास मज्जाव, हरित लवादाचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2017 21:52 IST

पणजी: मोपा विमानतळ प्रकल्पासाठी झाडे पाडण्याचे काम त्वरित बंद ठेवण्याचा आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिला आहे.

पणजी: मोपा विमानतळ प्रकल्पासाठी झाडे पाडण्याचे काम त्वरित बंद ठेवण्याचा आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिला आहे. पुढील आदेशापर्यंत ही स्थगिती लागू राहणार असल्याचे लवादाने म्हटले आहे. मोपा ग्रीनफील्ड विमानतळासाठी झाडे मारण्याचे काम त्वरित थांबविण्यात यावे यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर पुणे खंडपीठासमोर मंगळवारी अडीच वाजता सुनावणी सुरू झाली आणि ती ४ वाजेपर्यंत चालली.या दरम्यान सरकारी वकिलाने आपल्याला विमानाची फ्लाईट चुकणार असल्याचे सांगून सुनावणी पुढे ढकलण्याची विनंती लवादाला केली. लवादाने ती विनंती मंजूर करूनही घेतली, परंतु तोपर्यंत झाडे मारण्यास मज्जाव करण्यात आल्यामुळे सरकारची नामुष्की झाली.सुनावणी हेतूपुरस्सर पुढे ढकलण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा दावा याचिकादाराच्या वकिलाकडून करण्यात आला. कारण प्रकल्पासाठी झाडे मारण्याची कामे जोरात सुरू असल्यामुळे या प्रकरणात सुनावणी होऊ नये अशी सरकारची इच्छा आहे. त्यामुळे सुनावणी पुढे जरी ढकलण्यात आली तरी तोपर्यंत या प्रकल्पासाठी झाडे मारण्यास बंदी करण्याचा अंतरीम आदेश देण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली ती लवादाने उचलून धरताना पुढील आदेशापर्यंत झाडे कापण्याच्या कामाला स्थगिती दिली. हे प्रकरम आता २२ नोव्हेंबर रोजी ठेवण्यात आले आहे.या प्रकल्पादरम्यान सरकारच्या कृतीला आक्षेप घेणा-या दोन याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. पहिली हनुमंत आरोसकर व इतरांची तर दुसरी फेडरेशन आॅफ रेंन्बो वॉरियर्स यांनी दाखल केली होती.

टॅग्स :Natureनिसर्ग