शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील शाळांमध्ये महात्मा गांधींसोबत आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही दिसणार फोटो 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2017 13:48 IST

गोव्यातील सरकारी प्राथमिक शाळांच्या भिंतीवर बापूजी म्हणजे महात्मा गांधी यांचे फोटो आहेतच. मात्र आता शाळांच्या भिंतीवर बापूंसोबत पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचेही फोटो लावलेले पाहायला  मिळतील.

पणजी : गोव्यातील सरकारी प्राथमिक शाळांच्या भिंतीवर बापूजी म्हणजे महात्मा गांधी यांचे फोटो आहेतच. मात्र आता शाळांच्या भिंतीवर बापूंसोबत पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचेही फोटो लावलेले पाहायला  मिळतील. सर्व सरकारी कार्यालयांमध्ये मोदी व कोविंद यांचे फोटो लावा, अशी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सर्व खाते प्रमुखांना केलेली सूचना ताजी असतानाच आता शिक्षण खात्याने सर्व शिक्षकांना फोटो लावण्याविषयी बजावले आहे. यासाठी  6 नोव्हेंबर ही डेडलाईनही शिक्षकांना देण्यात आली आहे.

दिवाळीच्या सुट्टीनंतर पहिल्याच दिवशी जेव्हा मुले शाळेत येतील तेव्हा त्यांना भिंतीवर लावलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे फोटो दिसायला हवेत असे शिक्षण खात्याने सर्व सरकारी प्राथमिक शाळांच्या शिक्षकांना सांगितले आहे. त्यामुळे शिक्षक व मुख्याध्यापक यांची आतापासूनच धावपळ उडाली आहे. शिक्षण खात्याने फोटो लावणे हा एक कलमी कार्यक्रम तूर्त खूप गंभीरपणे घेतला आहे.

सर्व सरकारी शाळांच्या इमारती स्वच्छ ठेवा, वर्गात आणि वर्गाबाहेर स्वच्छता ठेवा. आम्ही अचानक येऊन स्वच्छतेची पाहणी करणार तसेच फोटो लागले आहेत की नाही हे देखील पाहू,असे शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांनी तालुका विभाग शिक्षणाधिकार्‍यांना सांगितले आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीgoaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकर