शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

४८ तासात घर बांधणीच्या परवानगीसाठी पावले उचलणार - कार्लुस आल्मेदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 16:55 IST

मुरगाव नियोजन विकास प्राधिकरण हद्दीत घर बांधायचे असल्यास या कार्यालयातून ४८ तासांच्या आत परवाना उपलब्ध करून देण्यासाठी पावले उचलणार आहे.

ठळक मुद्देमुरगाव नियोजन विकास प्राधिकरण हद्दीत घर बांधायचे असल्यास या कार्यालयातून ४८ तासांच्या आत परवाना उपलब्ध करून देण्यासाठी पावले उचलणारनिधी मिळविण्यासाठी सरकारला प्रस्ताव सादर करणार असल्याची माहिती कार्लुस आल्मेदा यांनी दिली

वास्को - मुरगाव नियोजन विकास प्राधिकरण हद्दीत घर बांधायचे असल्यास या कार्यालयातून ४८ तासांच्या आत परवाना उपलब्ध करून देण्यासाठी पावले उचलणार आहे. तसेच शहरातील खुल्या जागेत उद्यान-बालोद्यान उभारण्यासाठी पावले उचलणार आहे. यासाठी निधी मिळविण्यासाठी सरकारला प्रस्ताव सादर करणार असल्याची माहिती मुरगाव नियोजन तथा आमदार कार्लुस आल्मेदा यांनी दिली.

२०१७ मध्ये विधानसभा निवडणूक झाल्यापासून मुरगाव नियोजन विकास प्राधिकरणाच्या चेअरमनपदाची खुर्ची रिक्त होती. शुक्रवारी (९ नोव्हेंबर) वास्कोचे आमदार कार्लुस यांची चेअरमनपदी नियुक्ती करण्यात आली. यापूर्वी कार्लुस यांनी दोन वेळा हे पद सांभाळले आहे. सोमवारी ते तिसऱ्यांदा या पदाचा ताबा घेणार आहेत.

आमदार कालुर्स यांची या पदावर नियुक्ती करण्यात आल्यानंतर जनतेच्या हितासाठी त्यांच्याकडून काय पावले उचलण्यात येणार याबाबत त्यांच्याशी वार्तालाप केला असता स्वत:च्या जागेत घर बांधण्याकरिता या कार्यालयातून लागणारी परवानगी ४८ तासांच्या आत उपलब्ध व्हाव्या यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शहरात अनेक खुल्या जागा असून त्यांचा विकास करण्याकरिता मुरगाव नियोजन विकास प्राधिकरणाकडून पावले उचलण्यात येणार आहेत. यासाठी सरकारकडून आर्थिक मदत मागण्यात येईल, असे आल्मेदा यांनी सांगितले. शहरातील वाहतूक व्यवस्था आणखी सुधारावी यासाठी वाहतूक पोलिसांच्या मदतीने लवकरच आराखडा तयार करण्यात येणार असल्याचेही आल्मेदा यांनी सांगितले. ज्या ठिकाणी दिशा फलक इत्यादी गोष्टींची गरज आहे ते लवकर उपलब्ध करण्यात येणार, असे ते म्हणाले. दीड वर्षांपासून चेअरमनपदाची खुर्ची खाली होती. मात्र, या काळात नागरिकांकडून या कार्यालयाच्या कुठल्याच तक्रारी आलेल्या नसल्याचे आल्मेदा यांनी सांगितले.

दरम्यान कार्लुस आल्मेदा कदंब महामंडळ सरकारी वाहतूक बससेवेचे चेअरमनही असून त्यांच्याशी वास्कोत चालू असलेल्या नवीन कदंबा बसस्थानकाची माहिती जाणून घेतली. वास्को मतदारसंघातील नवीन बसस्थानकाचे काम सध्या जोरात चालू असून आतापर्यंत कंत्राटदाराला ९ कोटी ५० लाख रुपये फेडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ९६ कोटी रुपये खर्च करुन हा प्रकल्प उभारण्यात येणार असून बसस्थानकाबरोबर येथे दुकाने, सभागृह, सरकारी कार्यालये अशा विविध सुविधा उपलब्ध असणार अशी माहिती त्यांनी दिली. या प्रकल्पातून कदंबा महामंडळालाही पुढील काळात चांगला फायदा होणार असे कार्लुस म्हणाले. मागील दोन वर्षापासून या प्रकल्पाचे काम चालू असून येणाऱ्या दोन वर्षात वास्को कदंब बसस्थानक प्रकल्पाचे काम पूर्ण होणार अशी माहिती शेवटी दिली.

टॅग्स :goaगोवाHomeघर