शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

जनता महत्त्वाची, नंतर वाघ! दिव्या राणे कडाडल्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 09:15 IST

व्याघ्र प्रकल्प करू पाहणाऱ्यांनी लोकांची मते जाणून घ्यावीत

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : जे लोक म्हादई व्याघ्र क्षेत्र म्हणून जाहीर करू पाहत आहेत, त्यांनी अगोदर सत्तरीच्या लोकांसोबत एक बैठक घ्यावी. या लोकांचे म्हणणे जाणून घ्यावे व नंतर व्याघ्र क्षेत्राची मागणी करावी, अशी मागणी पर्येच्या आमदार दिव्या राणे यांनी केली. यावेळी त्यांनी आम्हाला अगोदर आमची जनता महत्त्वाची नंतर वाघ, असेही म्हटले.

म्हादई व्याघ्र क्षेत्र घोषित झाले तर त्याचा फटका सत्तरीलाच नाही तर पूर्ण ७५० चौरस किलोमीटर जंगलाला बसणार आहे. कारण एवढ्या मोठ्या जागेत व्याघ्र क्षेत्र येणार आहे. यात सत्तरीतील अनेक गावे, नेत्रावळी, मोले, तुर्ली, भीमगड अशा अनेक गावांना याचा फटका बसणार आहे. म्हादई अभयारण्यात ५ वाघ आहेत, असे सर्व्हेत सांगितले तरी आमचा याच्यावर विश्वास नाही. आम्ही त्याच भागाचे प्रतिनिधी आहोत. आम्हाला कधी वाघ दिसला नाही, असेही दिव्या राणे यांनी सांगितले.

गोवातील लोकांना याचा फटका बसणार आहे. हे लोक पिढ्यानपिढ्या राहत आहेत. त्यांचे स्थलांतर करणे शक्य नाही. या अगोदर लोकांचे स्थलांतर झाले आहे. पण, त्यांचे अजून कायदेशीर सोपस्कर पूर्ण झालेले नाहीत. स्थलांतरित लोकांची काय अवस्था असते हे अगोदर या लोकांनी जाणून घ्यावे. विनाकारण लोकांना त्रासदायक ठरणाऱ्या मागण्या करू नये, असे आमदार डॉ. दिव्या राणे म्हणाल्या.

आम्ही लोकांसोबत आहोत. सत्तरीतील आमच्या लोकांचे अधिकार त्यांचे अस्तित्व सांभाळायची जबाबदारी आमची आहे. आम्हाला अगोदर आमची जनता महत्त्वाची नंतर वाघ. त्यामुळे आमचा म्हादई अभयारण्यात व्याघ्र क्षेत्राला विरोध आहे, असे डॉ. दिव्या राणे यांनी सांगितले.

सत्तरीत ४१ शिक्षकांची कमतरता

सत्तरी भागातील सरकारी शाळांमध्ये ४१ शिक्षकांची कमतरता असल्याने शिकवणीवर परिणाम होत आहे. तसेच उपस्थित शिक्षकांवरही अतिरिक्त ताण पडत असल्याने सरकारने शिक्षकांची कमतरता त्वरित भरुन काढावी, अशी मागणी पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांनी विधानसभेत केली.शिक्षण, उच्च शिक्षणावरील अनुदानित मागण्यांवरील चर्चेवेळी त्या बोलत होत्या. पार्ट टाइम शिक्षकही कायम शिक्षकांच्या दर्जाचेच काम करतात. मात्र, तरीही त्यांना मिळणारा पगार फारच कमी आहे. त्यामुळे पार्ट टाइम शिक्षकांच्या पगारात सरकारने वाढ करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

आमदार राणे म्हणाल्या, एका बाजूने राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी केली जात असली तरी शाळा या इंटरनेट, संगणक आदी मूलभूत सुविधांनी सुसज्ज हव्यात. काही शाळांमध्ये वापरण्यात येणारे संगणक जुने आहेत. सरकारी शाळांमध्ये तर लायब्ररीसुध्दा नाही. तसेच शाळा व परिसरात अनुचित घटना घडू नये यासाठी सरकारी शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

सत्तरीतील सरकारी शाळांमध्ये ४१ शिक्षक व ३६ सहायक शिक्षकांची कमतरता आहे. शिक्षकांची ही संख्या भरून काढावी. पार्ट टाइम शिक्षकांना २५ हजार मिळत आहेत. हे शिक्षक कायम शिक्षकांप्रमाणेच काम करतात. मात्र, त्यांच्या पगारात मोठी तफावत असून, पगारात वाढ व्हावी. सत्तरीतील अनेक सरकारी शाळांची दुरवस्था झाली असून, त्यांची दुरुस्ती तातडीने करावी. याबाबतची फाइल वर्षभर झाले सरकार दरबारी प्रलंबित असून, ती लवकर मंजूर करावी, अशी मागणी डॉ. राणे यांनी केली.

 

टॅग्स :goaगोवाvidhan sabhaविधानसभा