शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

वेळेत सेवा न दिल्यास अधिका-याला दंड, 1 एप्रिलपासून गोव्यात कालबद्ध सेवा हमी कायदा लागू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2018 17:45 IST

1 एप्रिलपासून राज्यात कालबद्ध सेवा हमी कायद्याची 100 टक्के अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केली आहे.

पणजी : 1 एप्रिलपासून राज्यात कालबद्ध सेवा हमी कायद्याची 100 टक्के अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केली आहे. या कायद्यानुसार सेवा ठरावीक मुदतीत न दिल्यास संबंधित अधिका-याला दंड भरावा लागणार आहे.एकदा एखाद्या सेवेसाठी अर्ज आल्यावर अर्जाची छाननी करून ठरावीक मुदतीत ती सेवा अर्जदात्याला एक तर उपलब्ध करून द्यावी लागेल किंवा अर्जात त्रुटी असल्यास त्या नमूद करून फेटाळावा तरी लागेल.विनाकारण अर्ज प्रलंबित ठेवल्यास त्यासाठी जबाबदार असलेल्या कर्मचारी किंवा अधिका-याला दंडाची रक्कम भरावी लागेल. कालबद्ध सेवा हमी विधेयक गोवा विधानसभेत 4 वर्षांपूर्वी मंजूर करण्यात आले होते. विधेयकाचे कायद्यात रुपांतर होऊनही कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली नव्हती. काही दिवसांपूर्वी हा कायदा अगदीच अल्पसेवांपुरता लागू करण्यात आला होता. परंतु त्याची कार्यवाही व्यवस्थित होत नव्हती. या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी तयारी करण्यासाठी सरकारला मुदत हवी होती. बहुतेक सुविधांचे डिजिटलायझेशन करून त्या आॅनलाइन उपलब्ध करून देणे आवश्यक होते. हे काम मोठ्या प्रमाणावर झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.आॅनलाइन घरपट्टीसह नगरविकास यंत्रणेच्या 14 सेवा आॅनलाइन उपलब्ध करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी नगरविकासमंत्री फ्रांसिस्क डिसोझा यांच्या उपस्थितीत या नवीन सुविधा कार्यान्वित केल्या. नगरविकास खात्याच्या या पोर्टलवरच या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यात घरपट्टी भरणे, घरपट्टी दुस-याच्या नावावर करणे, व्यवसाय परवान्यासाठी अर्ज, शुल्क भरणे, साईनबोर्ड शुल्क भरणे, व्यवसाय परवान्यासाठी अर्ज, पाणी आणि वीज जोडणी घेण्यासाठीच्या नाहरकत दाखला. दुकानाचे भाडे भरणे, सभागृह वापरासाठी आरक्षित करणे, सिव्हेज टँकर, शववाहिका आरक्षण, उत्पन्नाचा दाखला, जन्ममृत्यू दाखले, दाखल्यातील चुकांत दुरुस्तीसाठी अर्ज करणे या सुविधांचा त्यात समावेश आहे. नगरविकास सचिव सुधीर महाजन, मुख्य प्रकल्प अधिकारी जगदीश होस्मणी, सुडाचे सदस्य सचिव अर मेनका आणि इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :goaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकर