शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

2019 मध्ये पतंजलीच्या जीन्स येणार बाजारात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2018 16:23 IST

आगामी वर्षात म्हणजेच 2019 मध्ये पतंजलीचे कपडे बाजारात येणार आहेत. पतंजलीचे लहानांपासून ते मोठ्यापर्यंतचे पारंपारिक आणि वेस्टन कपडे बाजारात आणणार असल्याची माहिती योगगुरु बाबा रामदेव यांनी दिली.

पणजी : आगामी वर्षात म्हणजेच 2019 मध्ये पतंजलीचे कपडे बाजारात येणार आहेत. पतंजलीचे लहानांपासून ते मोठ्यापर्यंतचे पारंपारिक आणि वेस्टन कपडे बाजारात आणणार असल्याची माहिती योगगुरु बाबा रामदेव यांनी दिली. गोव्यातील पणजी येथे अॅडव्हर्टायजिंग एजन्सीज असोसिएशन ऑफ इंडिया तर्फे आयोजित करण्यात आलेल्या 'गोवा फेस्ट-2018' या कार्यक्रमात त्यांनी सांगितले.लोक मला विचारतात आहेत की, पतंजलीची जीन्स बाजारात कधी येणार आहे? त्यामुळे याबाबत निर्णय घेतला असून लवकरच बाजारात पतंजलीचे कपडे आणणार आहोत. यामध्ये पारंपारिक कपड्यांसोबतच लहान मुले, महिला आणि पुरुषांसाठीचे कपडे 2019 पर्यंत बाजारात येतील. यासोबतच, आगामी काळात पतंजली स्पोर्ट्स आणि योगा साठीचे विशेष कपडेही तयार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, पतंजली आयुर्वेद वर्षानुवर्षे आर्थिकदृष्ट्या चांगली कामगिरी करीत असल्याचा दावा करत येत्या काळात पतंजली देशातील सर्वात मोठी कंपनी असेल, असे रामदेव बाबा यांनी सांगितले. रामदेव बाबा यांच्या पतंजली कंपनीचे सध्या सौंदर्यप्रसाधने आणि खाद्यपदार्थ बाजारात उपलब्ध आहेत. गेल्या वर्षी रामदेव बाबा यांनी स्वदेशी कपड्यांची ओळख म्हणून गारमेंट निर्मिती करण्याचा प्लॅन असल्याचे सांगितले होते. दरम्यान, महाराष्ट्रातील सोलापुरातून पतंजलीच्या माध्यमातून टेक्सटाईल उद्योग सुरू करण्याचे संकेत गेल्या काही दिवसांपूर्वी रामदेव बाबा यांनी दिले आहेत. पतंजली टेक्सटाईल ब्रँडचे टॉवेल आणि बेडशीट येथून तयार करण्याचे सूचक वक्तव्य केले होते. सोलापूरातील पतंजली योग समिती आणि भारत स्वाभिमान ट्रस्टच्या वतीने येथे तीन दिवसीय योग चिकित्सा ध्यान साधना शिबिर झाले, त्यावेळी ते बोलत होते.  

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबाpatanjaliपतंजली