शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
3
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
4
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
5
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
6
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
7
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
8
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
9
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
10
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
11
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
12
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
13
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
14
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
15
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
16
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
17
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
18
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
19
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
20
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?

गोव्यात होणारा पन्नासावा इफ्फी महोत्सव दोनापावलमधील नव्या संकुलात, मुख्यमंत्री पर्रीकर यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2017 18:38 IST

गोव्यातील दोनापावल येथे पाच ते सहा हजार प्रेक्षक क्षमतेचे प्रशस्त कन्व्हेन्शन सेंटर आणि एक हजार खोल्यांचे हाॅटेल व त्याचसोबत दहा स्क्रीन्स असलेल्या मल्टिप्लेक्सचे बांधकाम करण्यात येईल.

पणजी, दि. 13 - गोव्यातील दोनापावल येथे पाच ते सहा हजार प्रेक्षक क्षमतेचे प्रशस्त कन्व्हेन्शन सेंटर आणि एक हजार खोल्यांचे हाॅटेल व त्याचसोबत दहा स्क्रीन्स असलेल्या मल्टिप्लेक्सचे बांधकाम करण्यात येईल. 2019 साली पन्नासावा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) ह्या नव्या भव्य संकुलामध्ये आयोजित करण्यात येईल, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी येथे बुधवारी जाहीर केले.

गोवा मंत्रिमंडळाची बुधवारी बैठक झाली. त्या बैठकीत नव्या इफ्फी संकुलाविषयी चर्चा झाली. गोवा मनोरंजन संस्थेने या संकुलाचे बांधकाम करून घ्यावे असे गेल्यावर्षी ठरले होते. पण बुधवारी मंत्रिमंडळाने हे काम गोवा आर्थिक विकास महामंडळ( ईडीसी )व आयटीजीने मिळून करावे असे ठरविले आहे. ईडीसीकडून एसपीव्हीची स्थापना करून पीपीपी तत्वावर कन्व्हेन्शन सेंटर आणि एकूण इफ्फी संकुलाचे काम करून घेतले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

एकूण दोन टप्प्यांत काम केले जाईल. पहिल्या टप्प्यात दहा स्क्रीनचा मल्टिप्लेक्स आणि कन्व्हेन्शन सेंटर व दुसऱ्या टप्प्यांत हाॅटेल बांधले जाईल. जिथे पूर्वी आयटी हॅबीटेट येणार होते, त्या जागेत इफ्फी संकुल साकारेल. आयटी हॅबीटेट प्रकल्प पूर्वीच रद्द झाला आहे. पणजीपासून तीन किलोमीटरच्या अंतरामध्ये दोनापावलची ही जागा आहे.