शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पणजी स्मार्ट करताना महापौर-उपमहापौरांना डावलले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2017 20:02 IST

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत पणजी शहराचा समावेश झाला. त्यानुसार या शहरात कोट्यवधी रुपयांची कामे सुरू झाली आणि काही कामांचा शुभारंभही धडाक्यात होत आहे.

पणजी : केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत पणजी शहराचा समावेश झाला. त्यानुसार या शहरात कोट्यवधी रुपयांची कामे सुरू झाली आणि काही कामांचा शुभारंभही धडाक्यात होत आहे. पण हे सर्व कार्यक्रम या शहराचे प्रथम नागरिक असलेल्या महापौर सुरेद्र फुर्तादो यांना वगळून केले जात असल्याने सध्या हा चर्चेचा विषय बनला आहे. तसेच मॉन्सेरात गटातील नगरसेवकांविषयीही याबाबत चर्चा आहे.केंद्राच्या स्मार्ट सिटीअंतर्गत मिळालेल्या निधीतून पणजी शहरात विविध विकास कामांना आर्थिक विकास महामंडळाच्या (ईडीसी) माध्यमातून सुरुवात झाली आहे. मळ्यातील खाडीवरील पुलाचे उद्घाटन असो किंवा आल्तिनो येथील मोकळ्य़ा जागेच्या सुशोभिकरणाच्या कामाच्या कोनशिलेचे अनावरण असो, हे सर्व कार्यक्रम भारतीय जनता पक्षाने हायजॅक केलेत की काय, असे वाटू लागले आहे. शहरातील विकास कामांच्या शुभारंभाला प्रथम नागरिक म्हणून महापौरांनाच डावलण्यात येत असल्याने येथे राजकारणाचा वास येत आहे. त्याचबरोबर उपमहापौर लता पारेख यांनाही पूर्णपणो वगळले गेले आहे. 

महानगरपालिकेत बाबूश मॉन्सेरात यांची सत्ता आहे आणि मॉन्सेरात यांच्याच गटाचे फुर्तादो हे महापौर आहेत. सरकारमध्ये घटकपक्ष असलेल्या गोवा फॉरवर्डमध्ये मॉन्सेरात गेले असले तरी भाजपाकडून फुर्तादो यांना डावलले जात आहे. या विकासकामांचे सगळे श्रेय पर्रीकरांकडून माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांना देण्याचा प्रयत्न होत आहे. 

निमंत्रणाचे काहीच वाटत नाही : फुर्तादोस्मार्ट सिटीच्या कामाची आपण काळजी करीत नाही. त्याचबरोबर जो कोणी कामे करीत आहेत, त्यांनी ती करावीत. विकास कामाच्या शुभारंभास प्रथम नागरिक म्हणून मला निमंत्रण दिले नाही आणि त्याचे आपणास काहीच वाटत नाही. परदेशातून लोक आपणास भेटण्यास येतात, त्यात आपण समाधानी आहे. - सुरेंद्र फुर्तादो, महापौर.

टॅग्स :goaगोवा