शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

पणजीत १0५ निदर्शकांना अटक

By admin | Updated: November 22, 2015 01:37 IST

पणजी : फादर बिस्मार्क डायस मृत्यू प्रकरणाचा नि:पक्षपाती तपास करण्याची मागणी करत निदर्शने करणाऱ्या १0५

पणजी : फादर बिस्मार्क डायस मृत्यू प्रकरणाचा नि:पक्षपाती तपास करण्याची मागणी करत निदर्शने करणाऱ्या १0५ आंदोलकांना पोलिसांनी शनिवारी अटक केली. इफ्फीनिमित्त लागू करण्यात आलेल्या जमावबंदी कलमाचा भंग करण्यात आल्याने त्यांना अटक करण्यात आली. शनिवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास आझाद मैदानाजवळ निदर्शक जमले. अटक करण्यात आलेल्यांत स्वाती केरकर, वाल्मीकी नायक, सुदीप दळवी आदींचा समावेश आहे. यात एकूण ४८ पुरुष व ५७ महिलांचा समावेश होता. आंदोलकांपैकी १५ जणांना पर्वरी पोलीस स्थानकात, तर ९0 जणांना हणजूण पोलीस स्थानकात नेऊन बंदिस्त करण्यात आले होते. नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. फादर बिस्मार्क यांचा खूनच झाला आहे आणि त्याची चौकशी योग्य पद्धतीने होत नाही, असे निदर्शकांचे म्हणणे होते. त्याबद्दल निषेध म्हणून पणजी फेरीबोट धक्क्याजवळ प्रार्थना आयोजित करण्यात आली होती. तशी घोषणाही यापूर्वी निदर्शकांनी केली होती; परंतु इफ्फीमुळे पणजीत सुरक्षेच्या कारणासाठी जमावबंदी कायदा लागू करण्यात आला. जमावाच्या निदर्शनांमुळे या कायद्याचा भंग झाला. तसेच काळे झेंडे व निषेध फलकही निदर्शनकर्त्यांनी लावले होते. त्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक करून नेले. निदर्शक फार मोठ्या संख्येने असल्यामुळे त्यांना अटक करून नेण्यासाठी सहा गाड्या आणाव्या लागल्या. निदर्शकांना विविध पोलीस स्थानकांत ठेवण्यात आले होते. शांततापूर्व निदर्शने करणाऱ्यांना अटक करून सरकारने आपल्या हुकूमशाही वृत्तीचे पुन्हा प्रदर्शन घडविले असल्याची टीका आम आदमी पार्टीने केली आहे. पक्षाचे निमंत्रक वाल्मीकी नायक यांनी सरकारने केलेला हा अन्याय असल्याचे सांगितले. दरम्यान, अटक करण्यात आलेले आम आदमी पार्टीचे नेते सुदीप दळवी यांना उपचारासाठी गोमेकॉत नेण्यात आले होते. पोलिसांनी आपल्याला ढकलल्यामुळे आपण आपटल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले. गोमेकॉत त्यांचा एक्स-रे काढण्यात आला; परंतु त्यात कोणतीही दुखापत दिसून आली नाही. गोमेकॉत औषधोपचार करून घेण्यास दळवी यांनी नकार दिला. इंजेक्शनही घेणार नाही आणि औषधही घेणार नाही, असे त्यांनी डॉक्टरांना सांगितले. दरम्यान, वास्कोतील खारवीवाडा येथील काहीजण पणजीतील निदर्शनात भाग घेण्यासाठी जाण्याच्या तयारीत असल्याची कुणकुण वास्को पोलिसांना लागताच त्यांनी कुठ्ठाळी येथे जाऊन या आंदोलकांना ताब्यात घेतले. वास्को पोलीस स्थानकात सुमारे ४0 मिनिटे बसवून त्यांना सोडून देण्यात आले. (प्रतिनिधी)