शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

पणजीतील हातगाड्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2017 20:33 IST

पणजी शहराचा केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाल्याने त्याअंतर्गत अनेक ठिकाणी कामे सुरू असल्याचा सरकारचा दावा आहे. त्यामुळेच महानगरपालिकेने शहरातील ठिकठिकाणी लागणारे भेळपुरी-ऑम्लेटपावचे हातगाडे मेरी इमॅक्युलेट चर्चच्या परिसरात एकाच ठिकाणी आणले आहेत.

पणजी : पणजी शहराचा केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाल्याने त्याअंतर्गत अनेक ठिकाणी कामे सुरू असल्याचा सरकारचा दावा आहे. त्यामुळेच महानगरपालिकेने शहरातील ठिकठिकाणी लागणारे भेळपुरी-ऑम्लेटपावचे हातगाडे मेरी इमॅक्युलेट चर्चच्या परिसरात एकाच ठिकाणी आणले आहेत. ही तात्पुरती सोय असली तरी सध्याच्या ठिकाणी उद्यानाचे काम सुरू झाल्यानंतर हातगाडेवाल्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येणार आहे. महानगरपालिकेने काही महिन्यांपूर्वी शहरातील काही हातगाडे एकाच ठिकाणी आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले. त्यापैकी काही हातगाडे आयनॉक्सच्या मागील रस्त्यावर लावण्यात आले, तर दहा ते बारा हातगाडे चर्चच्या चौकातील उद्यानात लावण्यात आलेले आहेत. मनपाची ही तात्पुरती सोय असून, उद्यानाचे काम हाती घेतल्यास या हातगाडेवाल्यांना पुन्हा जागेसाठी मनपापुढे हात पसरावा लागणार आहे. स्मार्ट सिटी करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात आर्थिक विकास महामंडळाच्या (ईडीसी) माध्यमातून कामे सुरू आहेत. मनपानेही आपल्यापरीने कामे करण्यास सुरुवात केली आहे. त्यादृष्टीने मनपाने नॅशनल थिएटरची जागाही आपल्या ताब्यात घेतली आहे, त्या जागेचाही विकास करण्याचा मनपाचा मनोदय असेल. सध्या शहरातील वाहतूक बेटांवरील मोकळ्या जागेत विविध प्राण्यांची धातूंची शिल्पे उभारून त्यांचे सौंदर्यीकरण सुरू झालेले आहे. आयनॉक्सच्या मागील बाजूस सुरुवातीला एक पाणीपुरीचा गाडा लागत होता. त्याच्यानंतर शहरातील बांदोडकर मार्ग, मार्केट परिसरातील काही भेळपुरीचे हातगाडे मनपाने हटवून ती आयनॉक्सच्या मागील रस्त्यावर लावण्यास परवानगी दिली गेली आहे. त्यामुळे येथील गाडय़ांची संख्या पाचच्यावर गेली आहे. चर्च परिसरात मध्यरात्रीर्पयत वर्दळ!चर्चच्या परिसरातील उद्यानाच्या जागेत भेळपुरी, ऑम्लेट-पाव, बिर्याणी, थंडपेयांचे हातगाडे आहेत. त्यातील भेळपुरीवाले दहाच्या सुमारास बंद होतात. तर ऑम्लेट-पाव, बिर्याणी आणि थंडपेय वाल्यांचे गाडे रात्री उशिरार्पयत चालू असल्याने स्थानिकांबरोबरच पर्यटकही हातगाडय़ांवरील खाद्यपदार्थाचा आस्वाद घेतात. त्यामुळे या परिसरात मध्यरात्रीर्पयत लोकांची वर्दळ सुरू असते. पाहुया..पुढे काय ते!दहा वर्षापूर्वी येथे एकच पाणीपुरीचा गाडा लागत होता, आत्या पर्यटक म्हणून येणा-या ग्राहकांमुळे चांगला व्यवसाय होत होता. पण आता तेवढे पर्यटक येत नसून, त्यांना विविध पदार्थ उपलब्ध होत असल्याने ते त्या-त्या गाडय़ाकडे जातात. आमचे ठरलेले ग्राहक येतच असतात, असे येथील पाणी पुरी व भेळपुरी विक्री करणा-या कुमारबंधूंनी सांगितले. सर्वाना एकत्र आणले तरी उद्यान होणार असे सांगितले जात असल्याने पुन्हा जागेचा प्रश्न उपस्थित होणार असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. या त्यांच्या मतासारखेच येथील इतर गाडेधारकांचे मत आहे. 

टॅग्स :goaगोवा