पणजीतील हातगाड्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2017 08:29 PM2017-11-29T20:29:10+5:302017-11-29T20:33:59+5:30

पणजी शहराचा केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाल्याने त्याअंतर्गत अनेक ठिकाणी कामे सुरू असल्याचा सरकारचा दावा आहे. त्यामुळेच महानगरपालिकेने शहरातील ठिकठिकाणी लागणारे भेळपुरी-ऑम्लेटपावचे हातगाडे मेरी इमॅक्युलेट चर्चच्या परिसरात एकाच ठिकाणी आणले आहेत.

PANAJI HANDAGADAN question will come up again! | पणजीतील हातगाड्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येणार!

पणजीतील हातगाड्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येणार!

Next

पणजी : पणजी शहराचा केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाल्याने त्याअंतर्गत अनेक ठिकाणी कामे सुरू असल्याचा सरकारचा दावा आहे. त्यामुळेच महानगरपालिकेने शहरातील ठिकठिकाणी लागणारे भेळपुरी-ऑम्लेटपावचे हातगाडे मेरी इमॅक्युलेट चर्चच्या परिसरात एकाच ठिकाणी आणले आहेत. ही तात्पुरती सोय असली तरी सध्याच्या ठिकाणी उद्यानाचे काम सुरू झाल्यानंतर हातगाडेवाल्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येणार आहे. 
महानगरपालिकेने काही महिन्यांपूर्वी शहरातील काही हातगाडे एकाच ठिकाणी आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले. त्यापैकी काही हातगाडे आयनॉक्सच्या मागील रस्त्यावर लावण्यात आले, तर दहा ते बारा हातगाडे चर्चच्या चौकातील उद्यानात लावण्यात आलेले आहेत. मनपाची ही तात्पुरती सोय असून, उद्यानाचे काम हाती घेतल्यास या हातगाडेवाल्यांना पुन्हा जागेसाठी मनपापुढे हात पसरावा लागणार आहे. स्मार्ट सिटी करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात आर्थिक विकास महामंडळाच्या (ईडीसी) माध्यमातून कामे सुरू आहेत. मनपानेही आपल्यापरीने कामे करण्यास सुरुवात केली आहे. त्यादृष्टीने मनपाने नॅशनल थिएटरची जागाही आपल्या ताब्यात घेतली आहे, त्या जागेचाही विकास करण्याचा मनपाचा मनोदय असेल. सध्या शहरातील वाहतूक बेटांवरील मोकळ्या जागेत विविध प्राण्यांची धातूंची शिल्पे उभारून त्यांचे सौंदर्यीकरण सुरू झालेले आहे. 
आयनॉक्सच्या मागील बाजूस सुरुवातीला एक पाणीपुरीचा गाडा लागत होता. त्याच्यानंतर शहरातील बांदोडकर मार्ग, मार्केट परिसरातील काही भेळपुरीचे हातगाडे मनपाने हटवून ती आयनॉक्सच्या मागील रस्त्यावर लावण्यास परवानगी दिली गेली आहे. त्यामुळे येथील गाडय़ांची संख्या पाचच्यावर गेली आहे. 

चर्च परिसरात मध्यरात्रीर्पयत वर्दळ!
चर्चच्या परिसरातील उद्यानाच्या जागेत भेळपुरी, ऑम्लेट-पाव, बिर्याणी, थंडपेयांचे हातगाडे आहेत. त्यातील भेळपुरीवाले दहाच्या सुमारास बंद होतात. तर ऑम्लेट-पाव, बिर्याणी आणि थंडपेय वाल्यांचे गाडे रात्री उशिरार्पयत चालू असल्याने स्थानिकांबरोबरच पर्यटकही हातगाडय़ांवरील खाद्यपदार्थाचा आस्वाद घेतात. त्यामुळे या परिसरात मध्यरात्रीर्पयत लोकांची वर्दळ सुरू असते. 

पाहुया..पुढे काय ते!
दहा वर्षापूर्वी येथे एकच पाणीपुरीचा गाडा लागत होता, आत्या पर्यटक म्हणून येणा-या ग्राहकांमुळे चांगला व्यवसाय होत होता. पण आता तेवढे पर्यटक येत नसून, त्यांना विविध पदार्थ उपलब्ध होत असल्याने ते त्या-त्या गाडय़ाकडे जातात. आमचे ठरलेले ग्राहक येतच असतात, असे येथील पाणी पुरी व भेळपुरी विक्री करणा-या कुमारबंधूंनी सांगितले. सर्वाना एकत्र आणले तरी उद्यान होणार असे सांगितले जात असल्याने पुन्हा जागेचा प्रश्न उपस्थित होणार असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. या त्यांच्या मतासारखेच येथील इतर गाडेधारकांचे मत आहे. 

Web Title: PANAJI HANDAGADAN question will come up again!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा