शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

मांडवीतील कसिनो 100 दिवसात हटवू; पणजीत काँग्रेस उमेदवाराचं जाहीरनाम्यात आश्वासन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2019 21:32 IST

पणजी विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून जाहीरनामा प्रकाशित

पणजी : काँग्रेसचे उमेदवार बाबुश मोन्सेरात यांनी रविवारी जाहीरनामा प्रकाशित केला असून मांडवी नदीतून १00 दिवसांच्या आत कसिनो हटवण्याचे आश्वासन देण्यात आलेले आहे. तरुणांना नोकऱ्या, स्मार्ट सिटीच्या कामांमध्ये पारदर्शकता, सांतइनेज खाडीची साफसफाई, सुरळीत पाणी पुरवठा, अल्ट्रा मॉडर्न बस स्थानक, रायबंदरमध्ये फुटबॉल मैदान, जेटी व मार्केट इमारत आदी आश्वासने जाहीरनाम्यात देण्यात आलेली आहेत.‘पणजी व्हिजन डॉक्युमेंट’ या नावाने प्रकाशित केलेल्या या जाहीरनाम्यानंतर पत्रकारांच्या प्रश्नांवर बोलताना मोन्सेरात म्हणाले की, ‘या पोटनिवडणुकीत रिंगणात असलेल्या सर्व सहाही उमेदवार माझ्यासाठी स्पर्धक आहेत आणि मी प्रत्येकाचे आव्हान गंभीर मानतो. महापालिकेत आयुक्तपदावर आयएएस अधिकारी नकोच, असे माझे ठाम मत असून निवडून आल्यास या पदावर स्थानिक अधिकारी आणेन. कसिनो बंद करावेत, अशी माझी भूमिका नाही. मांडवीतील कसिनो मात्र दूर व्हायला हवेत.'गिरीश चोडणकर म्हणाले की, भाजपच्या जाहीरनाम्यात कसिनोंचा कोणताही उल्लेख नाही. आम्ही १00 दिवसात मांडवीतून कसिनो हटवणार आहोत. जाहीरनाम्यातील प्रत्येक आश्वासन पूर्ण केले जाईल. बाबुश मोन्सेरात हे निवडून आल्यास पहिल्या सात महिन्यातच त्याची प्रचिती येईल. प्रकाशनाच्यावेळी व्यासपीठावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर, महापौर उदय मडकईकर, माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो, माजी उपमहापौर यतिन पारेख, माजी महापौर तआ नगरसेवक विठ्ठल चोपडेकर, पणजी काँग्रेस गटाध्यक्ष प्रसाद आमोणकर, अ‍ॅड. यतिश नायक, माजी महापौर रुद्रेश चोडणकर आदी उपस्थित होते. हा जाहीरनामा तयार करण्याआधी लोकांच्या सूचना मागवण्यात आल्या. व्हॉट्सअप, इमेलद्वारे ५ हजारांहून अधिक सूचना आल्याचे सांगण्यात आले.  

टॅग्स :congressकाँग्रेसgoaगोवा