ऑनलाइन लोकमतपणजी, दि. 2 - 'सलाफी कर्नाटक' या वादग्रस्त झकीर नाईक समर्थक संघटनेच्या दोघा युवकांना पणजी पोलिसांनी अटक केली असून गुप्तचार विभागाकडून त्याची चौकशी सुरू आहे. अटक करण्यात आलेल्यांची नावे अब्दुल नसीर व एलियास इस्माईल अशी असून दोनापावला येथून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले व नंतर अटक केली. एलियास हा केरळमधील आहे तर अब्दुल हा गोव्यात राहतो. तो एलियासचा सोयराही आहे. विशिष्ठ पद्धतीची पत्रके (पेंम्पलेट्स) घेऊन ते असल्यामुळे कुणी तरी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी दोनापावला येथे जाऊन त्यांना पकडून आणले.संशयितांची दहशतवादी विरोधी पथकाकडून आणि गुप्तचर विभागाकडून चौकशी करण्यात आली. रात्री 11 वाजता त्यांना वैद्यकीय तपासासाठी गोमेकॉत नेण्यात आले. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांना आपल्याला पोलिसांनी विनाकारण पकडल्याचे सांगितले. दरम्यान संशयितांकडे जी पत्रके सापडली त्यात दक्षीण कर्नाटक सलाफी चळवळ या संघटनेचे प्रचार साहित्य होते. ही संघटना आय एस आयएसशी संंबंध असल्याचा ठपका असलेले झकीर नाईक यांचे समर्थन करते. दोघेही 30 वर्षे वयोगटातील आहेत.
पणजीत 2 सलाफींना अटक
By admin | Updated: January 2, 2017 23:29 IST