शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

‘मधुमेहाशी युद्ध पुकारा व्यायामाच्या जोरावर’

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 14:38 IST

मधुमेहाच्या (डायबीटीस) विळख्यातून स्वत:ला वाचविण्यासाठी व्यायामाच्या आधाराने मधुमेहाविरुद्ध युद्ध पुकारण्याचे आवाहन गोव्यातील प्रसिद्ध डायबेटीस तज्ज्ञ डॉक्टर तेजस कामा यांनी दिला आहे.

ठळक मुद्दे व्यायामाच्या आधाराने मधुमेहाविरुद्ध युद्ध पुकारण्याचे आवाहन गोव्यातील प्रसिद्ध डायबेटीस तज्ज्ञ डॉक्टर तेजस कामा यांनी दिलं आहे.भारत हा लोकसंख्येप्रमाणेच मधुमेहींच्या बाबतीतही चीननंतर दुसऱ्या क्रमांकांचा देश ठरला आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे नियमित किमान अर्धा तास तरी व्यायाम हा केलाच पाहिजे.

पणजी - मधुमेहाच्या (डायबीटीस) विळख्यातून स्वत:ला वाचविण्यासाठी व्यायामाच्या आधाराने मधुमेहाविरुद्ध युद्ध पुकारण्याचे आवाहन गोव्यातील प्रसिद्ध डायबेटीस तज्ज्ञ डॉक्टर तेजस कामा यांनी दिलं आहे. देशात पाच वर्षात मधुमेहींची संख्या दहा पटीने वाढली आहे. 

मेडिकल असोसिएशनने बारदेशतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. कामत यांनी मधुमेहासंबंधी सविस्तर माहिती दिली. भारत हा लोकसंख्येप्रमाणेच मधुमेहींच्या बाबतीतही चीननंतर दुसऱ्या क्रमांकांचा देश ठरला आहे. त्यामुळे मधुमेहाविरुद्ध युद्ध पुकारण्याची ही वेळ आहे. पाच वर्षात दहापटीने रुग्णांची संख्या वाढणे हे काही भल्याचे संकेत नाहीत. गोव्यातही परिस्थिती वेगळी नाही. पूर्वी केवळ प्रौढवयात किंवा चाळीसी पार केल्यानंतर मधुमेह आढळून यायचा. आता तरुणांनाही मधुमेह होत असल्याचे आढळून येत आहे. शिवाय हा अनुवांशिक रोग बनल्यामुळे अधिक काळजी घेण्याची गरज आहे. केवळ मधुमेह झालेल्यांनी नव्हे तर न झालेल्यानींही मधुमेहाविरुद्धच्या युद्धात पूर्ण ताकदीनिशी उतरायची गरज आहे. केवळ प्रौढांनी नव्हे तर तरुणांनी व त्या खालील मुलांनीही  सतर्क होण्याची ही वेळ आहे अशा शब्दात डॉ कामत यांनी परिस्थितीची जाणीव करून दिली आहे. 

मधुमेह का होतो व कुणाला होऊ शकतो हे आता जवळ जवळ सर्वांना ठाऊक आहे. साखरेचे व तेलकट खाणे ही कारणे असली तरी मधूमेह हा स्वादुपिंड निकामी होण्याने किंवा ते कमजोर बनल्याने होत आहे हे लक्षात ठेवायला हवे. त्यामुळे स्वादुपिंड चांगले ठेवण्यासाठी जे काही करावयाला हवे ते सर्व करण्याची गरज आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे नियमित किमान अर्धा तास तरी व्यायाम हा केलाच पाहिजे. त्यानंतर आहार व इतर गोष्टी येतात असे ते म्हणाले. एकदा का स्वादुपिंड कमजोर झाले की नंतर इन्सुलीन पुरेशा प्रमाणात तयार होत नाही. त्यामुळे मधुमेह होतो. मधुमेहामुळे मेंदु, डोळे, हृदय, यकृत, मूत्रपिंड आदी अवयवांचे विकार होण्याची अधिक शक्यता असते असे त्यांनी सांगितले. पत्रकारांसाठी मधुमेहासंबंधी तपासणी करण्याची इच्छा असल्याचे आर जे रुग्णालयाचे युरोसर्जन डॉ वर्धन भोबे यांनी यावेळी सांगितले व केव्हाही त्यासाठी काम करण्याची तयारी दर्शविली.

टॅग्स :goaगोवाdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटलHealthआरोग्य