शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणातून समाजकारण करण्याची आमची इच्छा: मुख्यमंत्री सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 12:30 IST

पर्वरीत कार्यकर्ता मेळावा उत्साहात.

लोकमत न्यूज नेटवर्क, पर्वरी : आम्ही राजकारण करण्यासाठी आलो नाही, राजकारणातून समाजकारण करण्याची आमची इच्छा आहे. राजकारण करणे हा आमचा व्यवसाय नाही. राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि शेवटी आम्ही, या तत्त्वावर आम्ही कार्य करतो. आम्ही नागरिकांसाठी, राज्यासाठी काम करतो. यासाठी अंत्योदय, ग्रामोदय आणि सर्वोदय या धोरणानुसार शेवटच्या व्यक्तीपर्यंत सरकारी योजना पोहोचाव्यात, असे उद्‌गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले.

बुधवारी (दि. २) येथील सुकूर पंचायत सभागृहात भाजप कार्यकर्ता मेळाव्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी पर्यटनमंत्री रोहन खंवटे, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, पर्वरी भाजप मंडळाचे अध्यक्ष विनीत परब, सिद्धार्थ कुंकळीकर, जिल्हा पंचायत सदस्य कविता गुपेश नाईक, सरपंच सोनिया पेडणेकर, स्वप्नील चोडणकर, पंच सदस्य व भाजप मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. या मेळाव्यास सुकूर, पेन्ह द फ्रान्स आणि साल्वादोर दु मुंद पंचायत क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

२०२७ च्या विधानसभा निवडणुकीसाठी झटूया

आमदार रोहन खंवटे यांनी आमच्या पक्षात बिनशर्त प्रवेश केला आणि ते भाजपमय झाले, तुम्हीही त्यांना पाठिंबा दिला. आज खंवटे पर्वरी मतदारसंघात उत्साहाने विकासकामे करतात. पर्वरी मतदारसंघाचा विकास इतर मतदारसंघापेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी समस्त कार्यकर्त्यांनी आणि आम्ही कार्यरत राहावयास हवे. २०२७ च्या निवडणुकीत २७ जागा निवडून आणणे हे आपले उद्दिष्ट आहे, ते साकारण्यास आपण झटूया, असे ते पुढे म्हणाले.

पक्षकार्य करा, दखल घेतली जाईल : दामू नाईक

पक्षाध्यक्ष दामू नाईक यांनी आपल्या ओघवत्या भाषणात तळागाळातून आलेल्या कार्यकर्त्यांमुळे पक्ष नावारूपास आला. कार्यकर्त्यांनी आवडीने काम केल्यास ते उच्च पदावर सहज पोहोचू शकतात. एक चहावाला पंतप्रधान बनू शकतो, आज भाजपमध्ये सामान्य कार्यकर्ता उच्चपदावर पोहोचू शकतो. कार्यकर्त्यांनी जोमाने पक्षाचे काम करावे, ते कधीच फुकट जाणार नाही, असे दामू नाईक म्हणाले. 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPoliticsराजकारणPramod Sawantप्रमोद सावंत