शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

तरुण तेजपाल विरुद्ध आरोप निश्चित करण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 08:51 IST

तीन वर्षांपूर्वी आरोपपत्र सादर करण्यात आलेले तरुण तेजपाल यांच्या विरोधात आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत.

म्हापसा, दि. 7 - तीन वर्षांपूर्वी आरोपपत्र सादर करण्यात आलेले तरुण तेजपाल यांच्या विरोधात आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने गुरुवारी हे आदेश दिले आहेत. 28 सप्टेंबर रोजी आरोप निश्चित करण्यात येणार आहेत. आरोपपत्र पूर्वीच्या युक्तीवादावरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर त्यावरील निवाडा राखून ठेवण्यात आलेला. सदर प्रकरणाची सुनावणी ‘इन कॅमेरा’ घेण्यात आलेली. न्यायमूर्ती विजया पोळ यांनी हा आदेश दिला. खास सरकारी वकील अ‍ॅड. फ्रान्सिस्को तावारीस यांनी या संबंधीची माहिती दिली. तेजपाल यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमाखाली लावण्यात आलेल्या कलमाखाली आरोप निश्चित करण्यात येणार असल्याचे अ‍ॅड. तावारीस म्हणाले या प्रकरणी न्यायालयाने मर्यादा लागू केल्यामुळे विस्तारीतपणे माहिती देणे शक्य नसल्याचे ते पुढे म्हणाले.न्यायालय या प्रकरणी आरोप निश्चित करतील व पुढील युक्तीवादाला सुरुवात होणार असल्याचे तेजपाल यांचे वकिल अ‍ॅड. प्रमोद कुमार दुबे यांनी सांगितले. यावेळी न्यायालयात अ‍ॅड. राजीव गोम्स, इतर वकिल तसेच तपास अधिकारी उपअधीक्षक सुनीता सावंत उपस्थित होत्या. 2013 साली एका तारांकित हॉटेलात आपल्या सहकारी महिलेवर तेजपाल यांनी केलेल्या कथित बलात्कार प्रकरणात गुन्हा अन्वेषण विभागाने (क्राईम ब्रांच) तेजपाल विरोधात 17 फेब्रुवारी 2014 साली विविध कलमांखाली आरोपपत्र दाखल केले होते. घटना घडल्यानंतर सुमारे 79 दिवसांत तपास अधिकारी उपअधीक्षक सुनीता सावंत यांनी हे आरोपपत्र दाखल केले होते. 30 नोव्हेंबर 2013 रोजी तेजपाल यांना अटक करण्यात आली होती.