शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वनहक्क मुद्यावर महसूलमंत्री विरोधी पक्षनेत्यात खडाजंगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2018 22:19 IST

वनहक्क विषयक दाव्यांच्या प्रश्नावरून विधानसभेत महसूलमंत्री रोहन खंवटे आणि विरोधीपक्षनेते बाबू कवळेकर यांची चांगलीच जुंपली. मागील विधानसभा अधिवेशनात दिलेलीच आश्वासने आताही दिली जात आहेत हे कवळेकर यांनी महसूलमंत्र्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर महसूलमंत्री त्यांच्यावर भडकले.

पणजी: वनहक्क विषयक दाव्यांच्या प्रश्नावरून विधानसभेत महसूलमंत्री रोहन खंवटे आणि विरोधीपक्षनेते बाबू कवळेकर यांची चांगलीच जुंपली. मागील विधानसभा अधिवेशनात दिलेलीच आश्वासने आताही दिली जात आहेत हे कवळेकर यांनी महसूलमंत्र्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर महसूलमंत्री त्यांच्यावर भडकले. त्यावर कवळेकर यांनीही त्यांना धारेवर धरले. आमदार इजिदोर फर्नांडीस यांनी काणकोणमधील लोकांचे वनहक्काविषयीचे दावे का पडून आहेत या विषयी प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना सरकार गोमंतकीयांच्या हिताची किती काळजी घेत आहे, विशेष करून आदिवासी भागातील लोकांच्या वनहक्कांविषयी आणि कुमेरी विषयी सरकारला किती जाणीव आहे आणि त्यांच्या हक्कांसाठी सरकार किती प्रयत्न करते आहे याची माहिती महसूलमंत्री खंवटे देत होते. विधानसभा अधिवेशन संपल्यानंतर विरोधीपक्षनेते कवळेकर व संबंधीतांची बैठक घेतली जाईल आणि या मुद्यावरील समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल असे त्यांनी सांगितले. त्यावर कवळेकर उभे राहिले आणि खंवटे यांनी हेच आश्वासन मागील विधानसभा अधिवेशनातही दिले होते असे सांगितले. प्रत्यक्षात आपण त्यांना याची आठवण करूनही त्यांनी बैठक घेतलीच नाही असे सभागृहात सांगितले. याच कारणामुळे खंवटे कवळेकर यांच्यावर भगडले व नंतर दोघातही शाब्दिक हल्ले प्रतिहल्ले झाले. सभापतीना मोठ्या कष्टाने त्यांना शांत करावे लागले. लोकांचे वनहक्काचे दावे पडून राहण्याची कारणे ही लोकांना वेगवेगळी कागदपत्रे सादर करायला सांगितले जात आहे ही आहेत.  दुसरी गोष्ट म्हणजे हे जमीनी मोजण्यासाठी जी मशिने वापरली जात आहेत ती कमी असल्यामुळे कामे कमी गतीने होत आहेत. अधिक मशिन्स उपलब्ध करून देण्यात यावीत. शिवाय ही मशिन्स अधुन मधून बंद पडत असल्यामुळे समस्या वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. यावर इजिदोर फर्नांडीस यांनी मशिन्सशिवाय टेप घेऊन मोजणी करण्याची सूचना केली. महसूलमंत्री रोहन खंवटे यांनी मशिन्सची समस्या दूर केली जाणार असल्याचे सांगितले. त्यात सॉफ्टवेरची जरा समस्या होती ती आता दूर करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. वनहक्क प्रकरणातील एका काणकोणमध्येच  १३३ फाईल्स अजून पडून असल्याची माहिती महसूलमंत्र्यांकडून देण्यात आली. या प्रकरणांची छाननी झालेली नसल्यामुळे  प्रकरणे का पडून राहिली आहेत असे कारणही देण्यात आले आहे. .

टॅग्स :goaगोवा