शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

सहकारात महिलांना, युवकांना संधी: मंत्री सुभाष शिरोडकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2023 09:13 IST

भारतीय सहकार सप्ताहाला उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्क फोंडा : सहकार क्षेत्र हे एकमेव असे क्षेत्र आहे ज्यामधून बेरोजगारांना रोजगार देण्याची क्षमता आहे. यासाठी गावातील काही महिलांनी व युवा वर्गाने पुढे येऊन काम करण्याची आवश्यकता आहे. महिलांना व युवकांना पुढे येऊन स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी उत्तम संधी आहे. त्याचा लाभ घ्यावा व आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी केले.

बाजार शिरोडा येथे गणेशोत्सव मंडळाच्या सभागृहामध्ये रविवारी गोवा सरकारच्या सहकार खात्यामार्फत ७० वा अखिल गोवा भारतीय सहकार सप्ताह साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या उ‌द्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून सुभाष शिरोडकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सन्मानीय पाहुणे म्हणून जिल्हा पंचायत सदस्य नारायण कामत, शिरोडा पंचायतीच्या सरपंच मुग्धा शिरोडकर, सहकार निबंधक मॅन्युएल बॅरेटो, प्रमुख व्यक्ती म्हणून डॉक्टर मधु घोडकिरेकर प्राध्यापक स्मिता श्रीवास्तव, बोरीचे सरपंच दुमिंगो वाज, बेतोडा सरपंच मधु खांडेपारकर, दुर्गेश गावडे, विनय नार्वेकर शिवानंद नाईक आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांच्या हस्ते करण्यात आले. सुभाष शिरोडकर पुढे म्हणाले, शैक्षणिकदृष्ट्या शिरोडा गाव राज्यात पुढे आहे. सहकार क्षेत्रातही शिरोडा गाव पुढे येण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. सत्तरी तालुक्यात दिवसाला सहा हजार लिटर दूध उत्पादन होते. तर इतर तालुक्यातील दूध उत्पादनावर शेतकऱ्यांनी भर देण्याची आवश्यकता आहे.

महिला एकत्र येत सुरु करु शकतात व्यवसाय

पाच ते दहा महिला एकत्र येऊन सहकार क्षेत्रात चांगली कामे करून स्वतः व्यवसाय सुरू करू शकतात. त्यासाठी केवळ महिलांनी पुढे येऊन इच्छाशक्ती दाखवण्याची गरज आहे. यावेळी प्रमुख वक्ते डॉ. मधु घोडकिरेकर, प्राध्यापक स्मिता श्रीवास्तव यांनी विशेष कामगिरी बजावल्याबद्दल संस्था व व्यक्तींचा मंत्री शिरोडकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी मॅन्युएल बॅरेटो यांनी सर्वांचे स्वागत केले. गौरी शिरोडकर यांनी सूत्रसंचालन केले.

 

टॅग्स :goaगोवा