शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पणजीच्या उपनगरातील नवा पूल खुला, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2017 20:02 IST

पणजीच्या नागरिकांची ब-याच वर्षांपासूनची मळा येथील पुलाची मागणी बुधवारी पूर्ण झाली. तिस-या पुलामुळे बसस्थानकाकडे जाणारी वाहतूक सुरळीत होणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केले. एकूण 24 कोटींचा हा पूल आहे.

पणजी : पणजीच्या नागरिकांची ब-याच वर्षांपासूनची मळा येथील पुलाची मागणी बुधवारी पूर्ण झाली. तिस-या पुलामुळे बसस्थानकाकडे जाणारी वाहतूक सुरळीत होणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केले. एकूण 24 कोटींचा हा पूल आहे.बुधवारी मुख्यमंत्री पर्रीकर यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून मळा ते पाटो प्लाझा असा रेड ब्रिज म्हणून ओळखल्या जाणा-या पुलाचे लोकार्पण केले. याप्रसंगी खासदार श्रीपाद नाईक, गोवा राज्य पायाभूत साधन-सुवधा विकास महामंडळाचे (जीएसआयडीसी) अध्यक्ष दीपक प्रभू पावसकर, आर्थिक विकास महामंडळाचे (ईडीसी) चेअरमन सिद्धार्थ कुंकळ्येकर, नगरसेवक मिनिन डिक्रूझ, नगरसेवक शुभम चोडणकर, रेखा कांदे, शीतल नाईक, भाजप मंडळाचे अध्यक्ष दीपक म्हापसेकर व जीएसआयडीसीच्या अधिका-यांची उपस्थिती होती.पर्रीकर म्हणाले की, पंचवीस वर्षापूर्वीचे या पुलाचे मळावासीयांचे स्वप्न आता पूर्ण झाले आहे. येथील जलवाहिनी दुसरीकडे स्थलांतरीत झाली असून, दुस-या पुलाच्या कामास लवकरच सुरुवात होईल. मळा, सांताक्रूझ आणि भाटलेतील नागरिकांना पणजीत आणि बसस्थानकाकडे जाण्यासाठी आता सोयीस्कर होणार आहे. उद्घाटनापूर्वी मुख्यमंत्र्यांनी पुलाची पाहणीही केली. याशिवाय दुस-या पुलाबाबत अधिका-यांनी येणा-या अडचणी त्यांच्या कानी घातल्या. उद्घटनानंतर पर्रीकर यांनी पुलावरून फेरफटका मारला याप्रसंगी येता-जाता लोक त्यांना वाढदिवासाच्या शुभेच्छा देत होते. वाहतुकीस पूल खुला झाल्यानंतर पोलीस खात्याचे वाहतूक विभागाचे निरीक्षक ब्रँडन डिसोझा यांनी सांताक्रूझकडून येणारी व बसस्थानकाकडे जाणारी वाहने या पुलावरून सोडण्यास सुरुवात केली.दरम्यान, 2016 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पर्रीकर हे संरक्षणमंत्री असताना त्यांच्या काळात या पुलाच्या कामाची कोनशिला बसविली होती. त्या कामाची पूर्तता यावर्षी आता होऊन मुख्यमंत्री म्हणून पर्रीकर यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन झाल्याची कोनशिला एकाच ठिकाणी लावल्या गेल्या आहेत. शुभारंभाला असणा-या पार्सेकरांची मात्र येथे बुधवारी उणीव होती, अन्यथा त्याचवेळचे सर्व मान्यवर उद्घाटनाला उपस्थित होते. दरम्यान, दोन लेनच्या पुलासाठी 24.24 कोटींची अंदाजीत खर्च असून, त्यातील एका लेनचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे एक मार्ग वाहतुकीस खुला झाला.

टॅग्स :goaगोवा