शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
3
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
4
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
5
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
6
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
7
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
8
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
9
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
10
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
11
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
12
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
13
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
14
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
15
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
16
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
17
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
18
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
19
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
20
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”

मजबूत पक्षसंघटनाच देईल भाजपला टक्कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2024 10:53 IST

आजच्या परिस्थितीत अयोध्येत राम मंदिर उभारणी मुद्दा महत्त्वाचा ठरलेला असून, सारा देश राममय झालेला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : डिचोली तालुक्यातील तिन्ही मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीसाठी भाजप अतिशय मजबूत स्थितीत सज्ज असून, उमेदवार कोण हा मुद्दाच नसेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या पद्धतीने देशाला मोठी उंची तसेच सुरक्षितता व विकास या बाबतीत केलेली कामगिरी हाच मुद्दा आहे. त्यामुळे तालुक्यात भाजपला विक्रमी मते मिळतील अशी भाजपला अपेक्षा आहे. असे असले तरीही आरजी, काँग्रेस व इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांनी गृहीत धरणे चुकीचे ठरेल अशा प्रतिक्रियाही व्यक्त होत आहेत.

डिचोली भाजप अध्यक्ष विश्वास गावकर, साखळी अध्यक्ष गोपाळ सुर्लकर यांनी सांगितले की, भाजपचे काम सुरूच आहे. उमेदवारी कोणालाही मिळाली तरी भाजप नक्कीच मोठी आघाडी घेण्यास सज्ज आहे. आज अशी स्थिती आहे की, भाजप मोठी मुसंडी मारणार असल्याचे तुळशीदास परब, संजय नाईक, सचिन साळकर यांनी सागितले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आमदार प्रेमेंद शेट, डिचोली आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये भाजपसाठी तळमळीने कार्यरत आहेत. त्यामुळे कानोसा घेता भाजप तालुक्यात मजबूत असल्याचे चित्र दिसत आहे. भाजपसाठी उमेदवार कोण हा मुद्दाच नसल्याच्या प्रतिक्रिया आहेत. काहींनी नवीन उमेदवार असावा, अशी प्रतिक्रिया दिली. तरीही विद्यमान खासदार श्रीपाद नाईक यांना उमेदवारी दिली तरही त्यांच्यासाठी कार्य करणार असल्याचे सांगितले.

तालुक्यात काँग्रेस पक्षाने बैठकांचे सत्र सुरू केलेले असून, डिचोली व साखळीतील काँग्रेस कार्यकर्ते सक्रिय होताना दिसतात. साखळीत काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत समाधानकारक मजल मारली होती, संघटन मजबूत करण्याचे काँग्रेस नेत्यांनी ठरवले आहे. त्याचा कितपत प्रभाव दिसून येणार हे येणाऱ्या काळात ठरेल. मात्र, काँग्रेसला गृहीत धरण्याची चूक कुणी करू नये. आमचे कार्य शिस्तबद्ध सुरू केले आहे, अशी प्रतिक्रिया माजी आमदार प्रताप गावस, प्रवीण ब्लेगन, आदींनी व्यक्त केली.

डिचोली तालुक्यात भाजपला टक्कर देणार तर संघटन मजबूत करण्यावर भर द्यावा लागेल, अशा प्रतिक्रिया ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केल्या आहेत. वस्तुस्थिती अशी आहे की, मागील वर्षभरापासून भारतीय जनता पक्षाचे कार्य अविश्रांत सुरू आहे. त्यामुळे त्यांचे संघटन कौशल्य मजबूत आहे. त्याचे लाभ भाजपला नक्कीच होईल, अशी प्रतिक्रिया वल्लभ साळकर, कालिदास गावस, सुभाष मळीक यांनी व्यक्त केली. आरजीच्या मनोज परब यांनी तालुक्यात काही मते मिळवली होती. युवा शक्तीचा एक घटक त्यांच्याकडे आहे. मात्र, संघटन मजबूत करणे, सामाजिक उपक्रम व लोकांना विशेष विश्वासात घेण्याचे कसब त्यांना साधावे लागेल. त्यांचे अनेक मुद्दे चर्चेत आहेत. मात्र, त्यासाठी प्रचाराची रणनीती व लोकसहभाग वाढवण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया त्यांचे समर्थक बोलून दाखवतात.

आजच्या परिस्थितीत अयोध्येत राम मंदिर उभारणी मुद्दा महत्त्वाचा ठरलेला असून, सारा देश राममय झालेला आहे. त्याचा मोठा लाभ हा भाजपला होईल, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही, असे ज्येष्ठ नागरिक सूर्यकांत देसाई यांनी सांगितले.

 

टॅग्स :goaगोवा