शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात टॅक्सींना स्पीड गव्हर्नन्ससाठी  एक वर्षाची सवलत, प्रक्रिया सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2018 20:42 IST

राज्यातील पर्यटक टॅक्सींना स्पीड गव्हर्नन्स लावावेच लागतील. फक्त त्यासाठी एक वर्षाच्या कालावधीची सवलत सरकारने तत्त्वत: मान्य केली आहे. सवलत देण्याविषयीच्या फाईलवर प्रक्रिया वाहतूक खात्याने सुरू केली आहे, असे सरकारी सुत्रांनी मंगळवारी सांगितले.

पणजी : राज्यातील पर्यटक टॅक्सींना स्पीड गव्हर्नन्स लावावेच लागतील. फक्त त्यासाठी एक वर्षाच्या कालावधीची सवलत सरकारने तत्त्वत: मान्य केली आहे. सवलत देण्याविषयीच्या फाईलवर प्रक्रिया वाहतूक खात्याने सुरू केली आहे, असे सरकारी सुत्रांनी मंगळवारी सांगितले.

यापूर्वी राज्यातील बसगाडय़ांना स्पीड गव्हर्नन्स लावण्यात आले आहेत. पर्यटक टॅक्सी वगळता अन्य टॅक्सींनाही स्पीड गव्हर्नन्स लावले गेले आहेत. फक्त पर्यटक टॅक्सींना स्पीड गव्हर्नन्स न लावल्याने त्यांना फिटनेस प्रमाणपत्र दिले जात नव्हते. तथापि, आता फेब्रुवारी 2019 पर्यंत टॅक्सी व्यवसायिकांना मुदत मिळणार आहे. या बारा महिन्यांच्या कालावधीत स्पीड गव्हर्नन्स लावण्याचे काम टॅक्सी मालकांना पूर्ण करावे लागेल, असे संबंधित अधिका-यांनी सांगितले. राज्यात पुरेशा प्रमाणात स्पीड गव्हर्नन्स आणि वितरक उपलब्ध व्हावेत म्हणून सरकारने सवलत देण्याचे ठरवले आहे. केंद्र सरकाच्या रस्ता वाहतूक मंत्रलयाने गेल्या डिसेंबर महिन्यात सर्व राज्य सरकारांना पत्र लिहून स्पीड गव्हर्नन्स  उपलब्ध नसतील तर थोडय़ा काळाची सवलत दिली जावी अशी सूचना केली होती. त्यानुसार सवलत दिली जात आहे. वाहतूक खात्याने याबाबतची फाईल पुढील प्रक्रियेसाठी वाहतूक सचिवांकडे पाठवली असल्याची माहिती मिळाली. सचिवांकडून ही फाईल वाहतूक मंत्र्यांकडे व तिथून मग मुख्यमंत्र्यांकडे पाठविली जाणार आहे.

दरम्यान, पर्यटक टॅक्सींना डिजीटल  मीटर मात्र आताच लावावेच लागतील. वाहतूक खात्याने निविदा जारी केली आहे. ती अंतिम टप्प्यात आहे. येत्या महिन्यात किंवा मार्चपासून डिजीटल मीटरची अंमलबजावणी सुरू होणार आहे. आपल्याला स्पीड गवर्नर नको म्हणून टॅक्सी व्यवसायिकांनी आंदोलन केले तरी, लोकांची आंदोलकांना सहानुभूती नव्हती याची कल्पना सरकारला आहे. सरकारने कशीबशी एक वर्षाची मुदतवाढ दिली पण यापुढे दिलासा मागण्यासाठी सरकार सर्वोच्च न्यायालयात मुळीच जाणार नाही. सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचा दावा काँग्रेसने केला होता पण तो चुकीचा आहे, असे सरकारमधील काही नेत्यांनी सांगितले. भाजपचे आमदार मायकल लोबो यांनी टॅक्सी व्यवसायिकांना जे पत्र दिले आहे, त्या पत्रचा सरकारशी संबंध नाही असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सोमवारी भाजप कार्यालयात झालेल्या भाजपच्या सर्व मंत्री, आमदारांच्या बैठकीत सांगितले आहे.

टॅग्स :goaगोवा