शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

'दामबाबचा ज्याच्या डोक्यावर हात तोच मडगावचा आमदार'; दिगंबर कामत यांना विजयाची खात्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 11:39 IST

मडगावमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अनेक उमेदवार तयार झाले आहेत व त्यांनी कामही सुरू केले आहे, त्याबद्दल विचारले असता कामत यांनी हे उत्तर दिले.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'ज्याच्या डोक्यावर दामबाबचा हात तो मडगावचा आमदार. मडगावकरांचा आशीर्वाद आणि दामबाबची कृपा यामुळेच मी वर्ष १९९४ मध्ये प्रथम आमदार बनलो व आजपावेतो विधानसभेत आहे. दामबाब व मडगावची जनता माझ्यासोबत आहे', असे म्हणत बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी वर्ष २०२७ च्या निवडणुकीतही आपणच निवडून येऊ, अशी खात्री व्यक्त केली.

मडगावमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अनेक उमेदवार तयार झाले आहेत व त्यांनी कामही सुरू केले आहे, त्याबद्दल विचारले असता कामत यांनी हे उत्तर दिले. 'तुम्ही मुख्यमंत्री असताना तयार केलेला २०२१ चा प्रादेशिक आराखडा लोकक्षोभामुळे स्थगित ठेवावा लागला याचे अजूनही वाईट वाटते का?' या प्रश्नावर कामत म्हणाले की, 'चार्लस कुरय्या हे माझे चांगले मित्र. माझ्या विनंतीवरूनच त्यानी आराखडा तयार करण्याची तयारी दाखवली. त्यावेळी त्यांनी एक अटही घातली होती ती अशी की, या कामात कोणताही दबाव आपल्यावर आल्यास आपण राजीनामा देईन. मी मुंबईला त्यांना दोन ते तीनवेळा भेटलो व याबाबतीत कोणीही हस्तक्षेप करणार नाही, असे आश्वस्त केल्यानंतरच त्यांनी जबाबदारी स्वीकारली. मात्र, नंतर ज्या पद्धतीने हा प्रादेशिक आराखडा स्थगित ठेवावा लागला हे दुर्दैवच म्हणावे लागेल.'

कामत म्हणाले की, 'मडगावच्या राजकारणात कोण प्रवेश करतेय याचीही मी चिंता करत नाही. कोणालाही राजकारण येण्याचा अधिकार आहे. मी १९९४ पासून मडगावातून निवडून येतो. माझे दार मडगावच्या जनतेसाठी सदैव खुले असते. सर्वसामान्य जनता हीच माझी खरी ताकद आहे. मी मुख्यमंत्री असतानाही लोकांना भेटत होतो. आताही भेटतो. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी माझे काम पाहून, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना संमतीने मला मंत्रिपद दिले आहे.

मला फरक पडत नाही

कामत म्हणाले की, विरोधकांनी तसेच कोणीही माझ्यावर टीका केली म्हणून काहीच फरक पडत नाही. मी लोकांच्या भल्यासाठी काम करतो. म्हणून गेली अनेक वर्षे निवडून येतो. काहीजण 'देवाचा माणूस' म्हणून टीका करतात. पण याचाही फरक पडत नाही. उलट आनंद होतो की काही नास्तिक लोकही माझ्यामुळे देवाचे नाव घेतात. माझी देवावर खूप श्रद्धा आहे. दामबाबाचा आशीर्वाद आणि मडगावच्या लोकांचे प्रेम आहे. ज्याच्यावर दामबाबचा आशीर्वाद, तो मडगावात कधीच पराभूत होऊ शकत नाही. मी वर्तमानात जगतो. इतिहासात ज्या काही गोष्टी घडल्या किंवा भविष्यात घडणार आहेत याबाबत मी कधीच काही बोलत नाही. आज काय आहे त्यावर बोलतो व त्यानुसार काम करतो. 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPoliticsराजकारण