शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

टँकरचे एक चाक पायावर चढले, अपघातात ५५ वर्षीय दुचाकीस्वार गंभीर जखमी

By पंकज शेट्ये | Updated: April 10, 2024 17:13 IST

आयओसी जंक्शनजवळ १२ चाकी टँकर आणि मोटरसायकल यांच्यात झाला अपघात

पंकज शेट्ये, लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को: बुधवारी (दि.१०) वास्कोतील आयओसी जंक्शन जवळ १२ चाकी टँकर आणि मोटरसायकल यांच्यात झालेल्या अपघातात हसन राजेसाब हजरथ्थी नामक इसम गंभीररित्या जखमी झाला असून त्याच्यावर इस्पितळात उपचार चालू आहे. हसन बायणा भागातून वास्कोला येताना जंक्शनजवळ पोचला असता तेथे वळण घेत असलेल्या टँकरची त्याच्या दुचाकीला धडक बसून तो खाली पडला असता, टँकरचे एक चाक त्याच्या पायावर चढून तो गंभीररित्या जखमी झाला.

वास्को पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार बुधवारी सकाळी ९.४५ वाजता तो अपघात घडला. बायणा येथे राहणारा ५५ वर्षीय हसन हजरथ्थी मोटरसायकल (जीए०६ जे ७४३४) वरून वास्कोला येत होता. जेव्हा तो जंक्शन जवळ पोचला त्यावेळी तेथे जंक्शनवर वळण घेणाऱ्या टॅंकरची (जीए ०६ व्ही ९६६६) धडक त्याच्या मोटरसायकलला बसली. त्या धडकेत हसन दुचाकीसहीत खाली पडला असता टॅंकरचे एक चाक त्याच्या पायावर चढले. त्या अपघातात हसन गंभीररित्या जखमी झाला असून त्याला प्रथम चिखली येथील उपजिल्हा इस्पितळात नेण्यात आले असून नंतर त्याला पुढच्या उपचारासाठी बांबोळीच्या गोमॅकॉ इस्पितळात पाठवले. वास्को पोलीसांना अपघाताची माहीती मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळावर दाखल होऊन अपघाताचा पंचनामा केला. अपघातात सापडलेल्या टॅंकर चालकाचे नाव बी ए लोकेश (कर्नाटक) असे असल्याची माहीती पोलीसांकडून मिळाली. वास्को पोलीस स्थानकाचे हवालदार आशीष नाईक त्या अपघात प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

वास्कोतून होणाऱ्या अवजड वाहतूकीमुळे निर्माण होणारे विविध त्रास भविष्यात दूर व्हावे यासाठी वास्कोत अवजड इत्यादी वाहतूकीसाठी उड्डाण पूल (फ्लाई ओव्हर) बांधण्याचे काम चालू आहे. बुधवारी सकाळी टॅंकर आणि दुचाकीचा अपघात होऊन ५५ वर्षीय हसन हजरथ्थी गंभीर रित्या जखमी झाल्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी त्या उड्डाणपूलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून वाहतूकीसाठी तो खुला करावा अशी मागणी केली.

टॅग्स :Accidentअपघातgoaगोवा