मातेकडून एका महिन्याच्या बाळाला हिसकावले, लाखाला विकले?; दोघा महिलांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 08:38 PM2020-03-01T20:38:27+5:302020-03-01T20:43:56+5:30

अटक करण्यात आलेल्यात मुरगाव नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा तारा केरकर व अन्य एका महिलेचा समावेश

A one-month-old baby smashed from mother, sold for 1 lakhs?; Two women arrested | मातेकडून एका महिन्याच्या बाळाला हिसकावले, लाखाला विकले?; दोघा महिलांना अटक

मातेकडून एका महिन्याच्या बाळाला हिसकावले, लाखाला विकले?; दोघा महिलांना अटक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वास्को: एका महीन्याच्या बाळाला तिच्या आईकडून बळजबरीने काढून दुसऱ्याला दिल्याप्रकरणात वास्को पोलीसांनी रविवारी (दि. १) पहाटे मुरगाव नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा तथा बिगरसरकारी संस्था चालवणाऱ्या तारा केरकर तसेच हे बाळ आपल्याशी ठेवलेल्या फातीमा दोरादो यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करून नंतर दोघांना अटक केली. 

आई कडून जबरदस्तीने काढण्यात आलेले बाळ पोलिसांनी चिखली येथे राहणाºया फातीमा दोरादो हीच्याकडून ताब्यात घेतल्यानंतर बाळाला बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार मातृछाया येथे पाठवण्यात आल्याची माहिती पोलीसांनी दिली. त्या आईकडून बळजबरीने नेण्यात आलेल्या एका महीन्याच्या बाळाला विकण्यात आले होते काय याबाबत पोलीस तपास करीत असल्याची माहीती पोलीस निरीक्षक निलेश राणे यांनी त्यांना संपर्क केला असता दिली.


शनिवारी (दि.२९) रात्री एका आईने वास्को पोलीस स्थानकावर येऊन तिच्या एक महीन्याच्या मुलाला बिगरसरकारी संस्था चालवणाºया तारा केरकर यांनी १ लाख रुपये घेऊन विकल्याची खळबळजनक माहीती दिली होती. अशा प्रकारची माहीती पोलीसांना मिळाल्यानंतर याबाबत योग्य चौकशी करून कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन पोलीसांनी त्या आईला दिले होते. 

एका महीन्यापूर्वी जन्मलेले ते बाळ कुठे आहे याची चौकशी पोलीसांनी करण्यास सुरवात केली असता चिखली येथे राहणाºया फातीमा दोरादो हीच्याशी ते बाळ असल्याचे उघड झाले. नंतर पोलीसांनी त्वरित कारवाई करून बाळाला ताब्यात घेतले. याबरोबरच रविवारी पहाटे ३.३० च्या सुमारास पोलीसांनी माजी नगराध्यक्षा तारा केरकर (वय ५६, रा: नवेवाडे) व फातीमा दोरादो (वय ४७, रा: चिखली) यांच्याविरुद्ध भादस ३४१, ३६३, ५०६ आरडब्ल्यु ३४ व गोवा बाल कायद्याच्या ८ कलमाखाली गुन्हा नोंद करून नंतर दोघांना अटक केली. २८ जानेवारी रोजी त्या आईने बांबोळी येथील गोमॅकॉ इस्पितळात मुलाला जन्म दिला होता. त्या आईची परिस्थिती गरीब असून तिला आश्रय देण्याचे आश्वासन तारा केरकर यांनी देऊन ती तिला काही दिवसापूर्वी नवेवाडे येथील आपल्या घरी घेऊन आली होती अशी माहीती आई कडून मिळाली आहे. आईला व एका महीन्याच्या मुलाला घेऊन तारा केरकर घरी आल्यानंतर तिने तिला जबरदस्तीने कोंडून ठेवल्याचे आई ने तक्रारीत सांगितले आहे. २८ फेब्रुवारी ला संध्याकाळी ४ च्या सुमारास आपल्या मुलाला जबरदस्तीने काढून घेतल्यानंतर तारा केरकर ने एका रिक्षा चालकाशी बाळाला दिल्यानंतर तो त्याला येथून घेऊन गेल्याचे आई ने पोलीसांना तक्रारीत सांगितले होते. मुलाला नेण्यात आल्याचे कोणाला सांगितल्यास याचे वाईट परिणाम होणार अशी धमकी आईला देण्यात आल्याचे पोलीसांनी माहीतीत पुढे सांगितले.

कशा बशा पद्धतीने आपण तारा केरकर हीच्या घरातून पळ काढली होती असे त्या आईने पोलीसांना आपल्या तक्रारीत सांगितले होते. तारा केरकर यांनी आई कडून एका महीन्याच्या मुलाला जबरदस्ती काढून घेतल्यानंतर ते तिने फातीमा हीला विकले होते काय अथवा येणाºया काळात हे बाळ अन्य कोणाला विकण्यात येणार होते काय की बाळ जबरदस्तीने काढून घेण्यामागचे अन्य काही कारण आहे काय याबाबत पोलीस तपास करीत असल्याची माहीती निरीक्षक निलेश राणे यांनी दिली. एका महीन्याच्या बाळाला पोलीसांनी ताब्यात घेतल्यानंतर बाल कल्याण समिती समोर उपस्थित केले असता त्या बाळाला सद्या मातृषाया येथे पाठवण्यात येण्याचा आदेश जारी करण्यात आलेले असल्याची माहीती पोलीस निरीक्षक निलेश राणे यांनी देऊन यानुसार बाळाला तेथे पाठवण्यात आल्याचे सांगितले. वास्को पोलीस स्थानकाचे निरीक्षक निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सर्वेश सावंत सदर प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे.

Web Title: A one-month-old baby smashed from mother, sold for 1 lakhs?; Two women arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.