शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

वेर्णा महामार्गावरील भीषण अपघातात चालकाचा मृत्यू, चार जण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2020 19:30 IST

ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना समोरून येणाऱ्या ट्रेलर ट्रक वाहनाची ‘स्विफ्ट डिजायर’ चारचाकीला समोरासमोरून जबर धडक बसून झालेल्या भीषण अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला.

 वास्को - भरधाव वेगाने जात असताना दक्षिण गोव्यातील वेर्णा महामार्गावर समोरून जात असलेल्या अन्य एका वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना समोरून येणाऱ्या ट्रेलर ट्रक वाहनाची ‘स्विफ्ट डिजायर’ चारचाकीला समोरासमोरून जबर धडक बसून झालेल्या भीषण अपघातात ताळगाव येथील २० वर्षीय रसल फर्नांडीस या युवक चालकाचा जागीच मृत्यू झाला. अपघातात सापडलेल्या त्या चारचाकीत पती - पत्नीसहीत त्यांची दोन मुले प्रवास करत असून या अपघातात हे चार जणांचे कुटूंब गंभीररीत्या जखमी झाल्याने त्यांना बांबोळीच्या गोवा वैद्यकीय इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.वेर्णा पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक किरण नाईक यांनी दिलेल्या माहीतीनुसार रविवारी सकाळी ११.३० च्या सुमारास सदर भीषण अपघात घडला. ताळगाव येथे राहणारा रसल फर्नांडीस हा २० वर्षीय युवक ‘स्वीफ्ट डीजायर’ टॅक्सी ने (क्र: जीए ०५ टी ५०६७) एका कुटूंबाला घेऊन मडगावच्या दिशेने जात होता. पिर्णी जंक्शन पार करून त्याची चारचाकी वेर्णा महामार्गावर पोचल्यानंतर रसलने त्याच्या वाहनाच्या पुढे असलेल्या अन्य एका वाहनाला ‘ओव्हरटेक’ करण्याचा प्रयत्न केला. याच वेळी समोरून येणा-या कंटेनर ट्रेलर ट्रक (क्र: एमएच ४३ व्हाय ३४४६) ने रसल चालवत असलेल्या चारचाकीला जबर धडक दिल्यानंतर त्याची चारचाकी यामार्गावरून जाणा-या अन्य एका चारचाकीला धडकली अशी माहिती पोलीसांनी दिली. ट्रेलर ट्रक ची जबर धडक रसल चालवत असलेल्या चारचाकीला बसल्याने त्याच्या चारचाकीचा दर्शनी भाग पूर्णपणे चक्काचूर झाला.सदर अपघाताची माहीती मिळताच वेर्णा पोलीसांनी तसेच अग्निशामक दलाच्या जवानांनी त्वरित घटनास्थळावर धाव घेऊन चारचाकी चालक रसल तसेच या वाहनात प्रवास करत असलेल्या वेलेंन्टीन कॉस्ता (वय ४८), सेंन्ड्रा कॉस्ता (वय ४६), एलिनो कॉस्ता (वय १३) व एल्रीको कॉस्ता (वय ९) यांना त्वरित वाहनातून बाहेर काढून उपचारासाठी इस्पितळात नेले. रसल फर्नांडीस यास मडगावच्या हॉस्पिसीयो  रुग्णालयात नेला असता येथे येण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. सदर अपघातात जखमी झालेल्या त्या चार जणाच्या कुटूंबाला बांबोळी येथील गोवा वैद्यकीय इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून सेंन्ड्रा ची प्रकृती थोडी चिंताजनक असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक किरण नाईक यांनी दिली.

अपघातात सापडलेल्या त्या चारचाकीत प्रवास करणारे हे कुटुंब राय, नुवे येथील असल्याची माहिती पोलिसांकडून उपलब्ध झाली आहे. वेर्णा पोलिसांनी सदर अपघाताचा तसेच मयत रसल फर्नांडीस याच्या मृतदेहाचा पंचनामा करून नंतर तो शवचिकित्सेसाठी पाठवून दिला. वेर्णा पोलीस स्थानकाचे निरीक्षक हरीष मडकईकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण नाईक या प्रकरणात अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघातgoaगोवा