शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

गोव्यात ओणम सणाचा वास्कोतून प्रारंभ    

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 15:47 IST

केरळातील बांधवांकडून मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणाऱ्या ओणम उत्सवाची गोव्यात पहील्यांदा सुरुवात वास्को भागातून झाली.

वास्को - केरळातील बांधवांकडून मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणाऱ्या ओणम उत्सवाची गोव्यात पहील्यांदा सुरुवात वास्को भागातून झाली. गोव्याला पोर्तुगीजांपासून मुक्ती मिळाल्याच्या दुसºया वर्षापासून हा उत्सव येथे साजरा करण्यात येतो. त्या काळात दाबोळी, वास्को भागात असलेल्या काही सशस्त्र दलातील जवानांनी प्रथम ओणम उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. संपूर्ण गोव्यात सुमारे २ लाख केरळी बांधव वास्तव्य करत असून त्यांच्याकडून साजरा करण्यात येणाºया ओणम उत्साहात गोमंतकीय बांधवांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभाग असत असल्याचे मागच्या काही वर्षापासून दिसून येते.हा उत्सव आता गोव्यातील बहुतेक भागात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. ओणम उत्सव हा कुठल्या एका धर्माचा नसून शेती कापणीच्या निमित्ताने हा उत्सव साजरा केला जातो. ओणम उत्सवात हिंदू , मुस्लीम तसेच ख्रिस्ती बांधव हे सर्वजण हा उत्सव साजरा करीत असल्याने ओणम हा एकात्मतेचे दर्शन घडवणारा उत्सव असल्याची प्रतिक्रीया ‘केरळ कल्चरल असोसिएशन’ चे अध्यक्ष तिरुनिलाथ रवीशंकर यांनी दिली.टी. रवीशंकर यांनी सांगितले की, १९ डीसेंबर १९६१ सालात गोव्याला पोर्तुगिजापासून मुक्ती मिळाल्यानंतर पुढच्या वर्षी अर्थात १९६२ सालात पहील्यांदाच गोव्यात ओणम उत्सव साजरा करण्यास सुरुवात झाली. त्या काळात दाबोळी भागात सशस्त्र दलाचे जवान वास्तव्य करायचे व त्यांनी पहील्यांदा मोठ्या उत्साहाने गोव्यात ओणम साजरा केला. यानंतर गोव्यात हळू हळू करून ओणम उत्सव साजरा होऊ लागला. पणजी, मडगाव, डिचोली व फोंडा भागातही सध्या हा उत्सव साजरा होतो. २००० सालात गोव्यात स्थापित असलेली विविध मल्याळी - केरळी संघटनांनी एकत्र येऊन त्यांनी पणजी शहरात मोठ्या उत्साहात ओणम सणाच्या निमित्ताने भव्य असा कार्यक्रम घडवून आणला. त्यानंतर कुठ्ठाळी, कळंगुट, झुआरीनगर अशा भागात केरळी समाजांची स्थापना होऊन नंतर येथही ओणमाच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजीत करण्यास सुरवात झाल्याचे रवीशंकर यांनी सांगितले.या उत्सवाच्या निमित्ताने पहिल्या दिवशी बहुतेक केरळी बांधव आपल्या कुटूंबातच हा उत्सव साजरा करतात. त्यादिवशी आपल्या घरात विविध प्रकारची फुलांची सजावट करणे, सुमारे १० ते १५ शाकाहारी खाद्यपदार्थ आपल्या घरात बनवणे अशा पद्धतीने या उत्सवाचा आनंद लुटला जातो, असे रवीशंकर यांनी सांगितले.दरम्यान, मंगोरहील - वास्को येथे असलेल्या केरळी बांधवांच्या अयप्पा मंदिराला ४१ वर्षे पूर्ण झालेली असून ओणम उत्सवाच्या निमित्ताने येथे आकर्षक फुलांची सजावट करण्यात येते. पहिल्या दिवशी अयप्पा मंदिरात दर्शन घेतल्यानंतर ओणम साजरा करण्यात येतो.गेल्या वर्षी केरळात पूरस्थिती निर्माण होऊन तेथे शेकडो नागरिकांना याचा मोठा त्रास सोसावा लागल्यानंतर वास्को तसेच गोव्यातील इतर भागात ओणम निमित्ताने काहीच कार्यक्रम आयोजित केले नव्हते. या कार्यक्रमासाठी जमवलेला निधी केरळातील पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी पाठवण्यात आला होता, अशी माहीती टी. रविश्ांकर यांनी दिली.

टॅग्स :goaगोवा