शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

आता OTP शिवाय LPG सिलिंडर मिळणार नाही; बुकिंगसाठी मार्गदर्शक सूचना, २५ दिवसांची अट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 07:30 IST

नागरी पुरवठा खात्याची सूचना; अफवांवर विश्वास ठेवू नये

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : नागरी पुरवठा खात्याने एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची सार्वजनिक सूचना जारी केली असून, एलपीजी सिलिंडर बुकिंगसाठी २५ दिवसांची अट घातली आहे. मागील सिलिंडरच्या वितरणास पंचवीस दिवस झाल्यानंतरच सिलिंडर बुक करता येणार आहे तसेच ओटीपीशिवाय वितरण केले जाणार नाही.

नागरी पुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार ग्राहकांना पुरेसा पुरवठा मिळावा, यासाठी ही पद्धत राबविण्यात येत आहे. सिलिंडरचे न्याय्य वितरण व्हावे आणि अनावश्यक बुकिंग टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

गरज नसताना बुकिंग नको 

गरज नसताना सिलिंडरचे बुकिंग करू नये. सिलिंडरची डिलिव्हरी घरपोच दिली जाईल. त्यामुळे गॅस एजन्सी किंवा डीलरकडे प्रत्यक्ष जाणे टाळावे. अफवा किंवा अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये. केवळ अधिकृत स्रोतांमधून मिळालेल्या माहितीलाच ग्राह्य धरावे, असे सांगण्यात आले आहे.

ग्राहकांना बुकिंगसाठी मार्गदर्शक सूचना

ग्राहकांनी एलपीजी सिलिंडरचे बुकिंग व्हॉट्सअॅप, मिस्ड कॉल सेवा, एसएमएस / आयव्हीआरएस प्रणाली, भारत बिल पेमेंट सिस्टिम, तेल कंपन्यांच्या मोबाइल अॅपद्वारे, अधिकृत पोर्टलवर जाऊन करावे, दुकानासमोर रांगा लावू नयेत, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

ओटीपी सादर केल्यानंतरच वितरण

याशिवाय खात्याने आणखी एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. एलपीजी सिलिंडरचे वितरण केवळ ओटीपी सादर केल्यानंतरच करण्यात येईल. त्यामुळे ग्राहकांनी आपल्या मोबाइलवर आलेला ओटीपी वितरकाला दाखवणे आवश्यक राहणार आहे.

खात्याने सर्व ग्राहकांना या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले असून, यामुळे एलपीजीचे न्याय्य आणि सुरळीत वितरण सुनिश्चित होईल, असे नमूद केले आहे.

गॅस संदर्भातील तक्रारींसाठी तालुकावार अधिकाऱ्यांची नियुक्ती

राज्य सरकारच्या नागरी १ पुरवठा आणि ग्राहक व्यवहार खात्याने राज्यातील एलपीजी गॅस सिलिंडरचा काळाबाजार, साठेबाजी आणि अनुचित व्यापारी प्रकारांना आळा घालण्यासाठी कडक पावले उचलली आहेत.

यासंदर्भात नागरिकांना आपल्या तक्रारी थेट नोंदवता याव्यात यासाठी प्रत्येक तालुक्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करून त्यांचे संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत.

नागरी पुरवठा संचालक जयंत तारी यांनी जनतेला आवाहन केले आहे की, एलपीजी वितरणाबाबत कोणतीही तक्रार असल्यास संबंधित तालुका सहायक संचालकांशी दूरध्वनी किंवा ई-मेलद्वारे संपर्क साधावा. गॅस वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी आणि ग्राहकांची फसवणूक थांबवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

येथे साधा संपर्क

खात्याने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, पेडणे तालुक्यासाठी भानू गोलतेकर ८९५६०६१८४२, बार्देशसाठी दीपा फुलारी ८९५६०६१८४०, तिसवाडीसाठी सृष्टी वायंगणकर ८९५६०६१८४४, डिचोलीसाठी रौनक कामत ८९५६०६१८४१, सत्तरीसाठी राजेश आर्लेकर ८९५६०६१८४३ आणि फोंडा तालुक्यासाठी गौरव नाईक ८९५६०६१८४५ यांच्याशी संपर्क साधता येईल. तसेच धारबांदोडा तालुक्यासाठी गौरव नाईक ९९२३५३०८१२, साष्टीसाठी दर्शन हरमलकर ८९५६०६१८४८, मुरगावसाठी तुळशीदास दाभोळकर ८९५६०६१८४९, सांगे तालुक्यासाठी उल्हास वेळीप ८९५६०६१८४७, केपे तालुक्यासाठी पूजा नाईक गावकर ८९५६०६१८५० आणि काणकोण तालुक्यासाठी उल्हास वेळीप ८९५६०६१८५१ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : No LPG Cylinder Without OTP; New Booking Rules, 25-Day Gap

Web Summary : LPG cylinders now require OTP for delivery. Bookings are allowed 25 days after the last delivery. The Civil Supplies Department aims for fair distribution and discourages unnecessary bookings. Contact designated officers for gas-related complaints.
टॅग्स :goaगोवाLPG Gas Crisisएलपीजी गॅस टंचाईCylinderगॅस सिलेंडर