शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
2
'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले
3
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
4
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
5
कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हालचाली वाढल्या! डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत?
6
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
7
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
8
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
9
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
10
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
11
महापालिका निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला! भाजप विरुद्ध काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना, एमआयएम
12
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
13
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
14
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
15
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
16
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
17
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
18
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
19
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
20
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
Daily Top 2Weekly Top 5

सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणी ईडीची हॉटेल व्यावसायिक गौरव आर्याला नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2020 18:20 IST

सोमवारी चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले.

पणजी: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणी मनी लाँडरिंगच्या दिशेने तपास करणाऱ्या सक्त वसुली संचालनालयाने गोव्यातील हॉटेल व्यावसायिक गौरव आर्या याला ३१ रोजी चौकशीकरिता उपस्थित राहण्यासाठी नोटिस बजावली आहे.

ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या घराच्या दारावर ही नोटिस चिकटविली आहे. या प्रकरणात रिया हिला डिलिट केलेल्या वॉटसअप मॅसेजीसबद्दल अधिकाऱ्यांनी विचारणा करुन काही मॅसेजीस प्राप्त केल्याची माहिती मिळते. अंमली पदार्थ व्यवहार प्रकरणी हे मॅसेजिस असल्याचा कयास आहे.गौरव आर्या याच्या मालकीच्या हणजुण येथील ‘हॉटेल टॅमेरिंड’ला ईडीच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली असता ते बंद आढळले. त्यामुळे हॉटेलच्या दरवाजावर नोटिस चिकटविण्यात आली. आर्या याला ३१ रोजी मुंबईत सकाळी ११ वाजता ईडीचे साहाय्यक संचालक राजीव कुमार यांच्यासमोर चौकशीसाठी उपस्थित राहण्यास बजावले आहे. आर्या याच्या मालकीचे ‘कॅफे कोटिंगा’ हे अन्य एक आस्थापनही गोव्यात आहे. मात्र हॉटेल आणि हे आस्थापन लॉकडाउनपासून बंदच आहेत.

दरम्यान, गोव्यात रिसॉर्ट असलेला हॉटेल उद्योजक गौरव आर्या या प्रकरणात एनसीबीच्याही रडारखाली आहे. अलीकडेच वागातोर येथे झालेल्या रेव्ह पार्टीत अमली पदार्थांच्या पुरवठ्याचे गूढही याच प्रकरणाशी जोडले जात आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी राष्ट्रीय अमली पदार्थ नियंत्रणचे क्षेत्रीय विभागाचे पथकही गोव्यात आहे. दिल्लीहून या तपासकामाची सूत्रे हलविली जात आहेत. संशयित रिया चक्रवर्ती व गौरव आर्या यांच्यातील कथित वॉटसअप चॅट हाती लागल्याचा दावा तपास एजन्सीने केला आहे. त्यामुळे आर्या याची चौकशी या प्रकरणात आवश्यक बनली आहे. १६ ऑगस्ट रोजी गोव्यात हणजुण येथे रेव्ह पार्टी झाली होती. गोवा क्राईम ब्रँचने कारवाई करुन ती बंद पाडली होती. या पार्टीत अमली पदार्थांचा वापर झाला होता. 

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयgoaगोवा