शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रिपद सोडायला सांगितलेले नाही; बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2023 08:26 IST

मुख्यमंत्री सावंत यांच्याशी सविस्तर चर्चा.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मंत्रिमंडळात फेररचना केली जाईल व त्यासाठी अगोदर सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री नीलेश काब्राल यांचा राजीनामा घेतला जाईल, अशा प्रकारची चर्चा गेले दोन दिवस आहे. मुख्यमंत्री सावंत यांना काब्राल यांनी भेटून चर्चाही केली आहे. मात्र, राजीनाम्याचा विषय आलेला नाही, असा काब्राल यांचा दावा आहे.

'लोकमत'ने काल फोनवरून काब्राल यांच्याशी संपर्क साधला. मंत्रिपद सोडण्याची सूचना आलेली आहे काय? असे काब्राल यांना विचारले असता, आपल्याला तसे कुणी सांगितलेले नाही, असे ते म्हणाले. 'मी मुख्यमंत्री सावंत यांना भेटलो हे खरे आहे; पण माझ्याकडे त्यांनी राजीनामा मागितलेला नाही,' असे काब्राल म्हणाले.

दरम्यान, काब्राल हे दोन दिवसांपूर्वी दिल्लीलाही जाऊन आले. त्यांना भाजप श्रेष्ठींनी बोलावणे पाठवले होते. काब्राल यांचे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्याशी बोलणी झाली असल्याची माहिती मिळते. नुवेचे आमदार आलेक्स सिक्वेरा यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार आहे. त्यासाठी काब्राल यांना मंत्रिपद सोडायला सांगितले जाईल. त्यांना तसे कळविण्यात आले असल्याची माहिती मिळते. मात्र, काब्राल ही गोष्ट मान्य करत नाहीत.

मुख्यमंत्री सावंत यांच्याशीही काब्राल यांची सविस्तर चर्चा झाली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यात नुकतीच अभियंत्यांची जी भरती झाली, त्याविषयीही मुख्यमंत्र्यांशी काब्राल यांची बोलणी झाली आहेत.

राजीनामा देण्यास नकार?

दरम्यान, काब्राल हे बांधकाम मंत्री या नात्याने सक्रिय आहेत. ते चांगले काम करत आहेत, असे अन्य आमदार व मंत्री सांगतात. कुडचडे मतदारसंघातही ते जोरात विकासकामे करतात. मग अशा परफॉर्मिंग मंत्र्याला का काढले जात आहे? अशी विचारणा काही मंत्री करू लागले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री सावंत यांच्यासमोरही पेच निर्माण झाला आहे. उद्या समजा काब्राल यांना राजीनामा देण्यास सांगितले गेले तरी, ते राजीनामा देणार नाहीत, असे काब्राल यांच्या खासकार्यकर्त्यांच्या वर्तुळातील दोघांनी 'लोकमत'ला सांगितले.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण