शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

गोवा विद्यापीठाने घालवले 50 कोटी, मानांकन घसरल्यामुळे ‘रुसा’चे अनुदान नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2018 11:16 IST

गोव्यातील ५ महाविद्यालयाना दोन दोन कोटी मंजूर

पणजी - राष्ट्रीय उच्च शिक्षण अभियानाअंतर्गत गोव्यातील ५ महाविद्यालयांना प्रत्येकी २ कोटी रुपये केंद्राकडून मिळणार आहेत. गोवा विद्यापीठाच्या मानांकनात घसरण झाल्यामुळे विद्यापीठाला मिळणार असलेले ५० कोटी रुपये आता मिळू शकणार नाहीत.  राष्ट्रीय उच्च शिक्षा अभियान अंतर्गत केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाने उच्च  शिक्षणाच्या साधनसुविधा वाढविण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. देशातील चांगल्या महाविद्यालयांना त्यासाठी दोन-दोन कोटी रुपये अनुदान दिले जाते. गेल्या वर्षीही काही संस्थांना अनुदान देण्यात आले होते. तर यंदा ५ संस्थांना अनुदान मिळाले आहे. सरकारी महाविद्यालय केपे, जी व्ही एम  बीएड महाविद्यालय फोंडा, निर्मला बिएड महाविद्यालय पणजी, सरकारी महाविद्यालय साखळी आणि सरकारी महाविद्यालय खांडोळा या महाविद्यालयांना यंदा हा निधी मंजूर झाला आहे.

रुसातर्फे देण्यात येणारे अनुदान खर्च करण्यासाठीही काही निकश ठरवण्यात आलेले आहेत. २ कोटी रुपयांपैकी ७० लाख रुपये ही नवीन इमारत बांधण्यासाठी वापरता येतात तर ७० लाख रुपये हे इमारत दुरुस्तीसाठी वापरता येतात. ऊर्वरीत ६० लाख रुपये हे शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी वापरावे लागतात. केपे महाविद्यालयाचे माजी प्राचार्य व उच्च शिक्षण खात्याचे माजी संचालक भास्कर नायक यांनी ही माहिती दिली. 

गोवा विद्यापीठाला ५० कोटी रुपये मिळणार होते. त्यासाठी विद्यापीठाकडून रीतसर अर्ज करण्यापासून सर्व सोपस्कारही पूर्ण करण्यात आले होते. परंतु नॅकच्या मानांकनात विद्यापीठाची घसरण झाल्यामुळे हा निधी निदान यावेळी तरी गोवा विद्यापीठाला मिळणार नाही. मानांकनात सुधारणा झाल्याशिवाय मदतीची अपेक्षा विद्यापीठाला धरता येणार नाही. मडगाव येथील कारे कायदा महाविद्यालय आणि पणजी येथील साळगावकर कायदा महाविद्यालयांनाही यंदा २ कोटी रुपयांचा निधी संमत होवू शकला नाही. या दोन्ही संस्थांना मिळालेल्या नॅकच्या मान्यतेची वैधता संपली असून अद्याप त्याचे नूतनीकरण झालेले नसल्यामुळे त्यांना निधी मिळाला नाही.

टॅग्स :goaगोवाuniversityविद्यापीठ