शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
5
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
6
Operation Sindoor Live Updates: भारताचा कोणताही शत्रू वाचू शकत नाही, अमित शाहांची पोस्ट
7
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
8
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
9
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
11
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
12
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
13
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
14
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
15
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
16
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
17
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
18
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
19
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
20
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?

कार्यक्षमतेबद्दल शंका घेण्याचे कारणच नाही!

By admin | Updated: September 15, 2014 01:40 IST

श्रीपाद नाईक यांचा दावा : रोज १८ तास काम; राज्यातही आणले तीन मोठे प्रकल्प

किशोर कुबल-पणजी : रोज १८ तास काम करतो, त्यामुळे कोणी आपल्या कार्यक्षमतेबद्दल शंका घेण्याचे कारण नाही. तीन महिन्यांचा काळ अत्यल्प असून मोठ्या अपेक्षा बाळगणे योग्य नव्हे, असे प्रतिपादन केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) श्रीपाद नाईक यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले. याआधीही आपण केंद्रात मंत्री होतो तेव्हा आठ तास काम करायचो, आता काम वाढले आहे, असेही ते म्हणाले. पंतप्रधानांनी कामगिरीचा अहवाल मागितल्याचे वृत्त मात्र त्यांनी फेटाळून लावले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या १४ केंद्रीय मंत्र्यांच्या कामगिरीबाबत अहवाल मागितला आहे त्यात श्रीपाद नाईक यांचाही समावेश असल्याचे वृत्त आहे. या अनुषंगाने नाईक यांच्याशी संवाद साधला. केंद्रात याआधीही तुम्ही मंत्री होता तेव्हाची कारकीर्द आणि आता यात काय फरक वाटतो, असे विचारले असता ते म्हणाले की, निश्चितच पूर्वी इतके काम नव्हते अर्थात, काम करण्यासाठी कोणी दबाव आणत आहे अशातलाही भाग नाही. मी माझ्या अंत:करणाला स्मरून रोज किमान १८ तास देशाच्या जनतेसाठी देतो, कोणी सांगतो म्हणून नव्हे. तुमच्या कामगिरीवर मोदी असमाधानी असल्याचे वृत्त आहे हे खरे आहे का, असे विचारता ते म्हणाले की, मोदींनी आपल्याकडे कोणताही अहवाल मागितला नाही. उलट आपण स्वत:हून तीन महिन्यांतील कामगिरीचा तपशील केंद्र सरकारला १00 दिवस पूर्ण झाले त्याच दिवशी पंतप्रधान कार्यालयाला पाठवला आहे. केलेल्या कामाची माहिती २५ सप्टेंबरपर्यंत पत्रकार परिषद घेऊन जाहीर करण्यास सांगितले आहे ती मी करणार आहे. शंभर दिवसातील कामगिरीवर प्रकाश टाकाल काय? गोव्यासाठी काय आणले? या प्रश्नावर नाईक म्हणाले की, वाराणसी शहराचा चेहरामोहरा बदलणारा मोठा प्रकल्प येत आहे त्यासाठी पर्यटन खात्याचे महत्त्वाचे योगदान आहे. या प्रकल्पाचा रोड मॅप तयार आहे. एक -दोन महिन्यांत कामे मार्गी लागतील. काश्मीर पूरग्रस्तांना खात्याच्या माध्यमातून १00 कोटी रुपये दिले. या काळात ८७ कोटींचे तीन मोठे प्रकल्पही गोव्यासाठी आणले. फर्मागुढी येथे हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज इमारतीसाठी पायाभरणी झालेली आहे. हा प्रकल्प ४0 कोटींचा आहे. करंझाळे येथे ३८ कोटींचा जलक्रीडा प्रकल्प येत आहे. मुरगाव बंदरात ९ कोटींचे क्रुझ टर्मिनल येत आहे. वर्षभराचे काम तीन महिन्यांत कसे शक्य होईल. ते म्हणाले, गोव्यात सेंट फ्रान्सिस झेवियर पवित्र शवप्रदर्शन येत्या नोव्हेंबरमध्ये होणार असून ४४ दिवस चालणाऱ्या या शवप्रदर्शनाला ५0 लाखांहून अधिक भाविक अपेक्षित आहेत. हा पवित्र शवप्रदर्शन सोहळा केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या कॅलेंडरवर येणार असून अधिकाधिक पर्यटकांना त्यानिमित्त गोव्यात आणण्याचा प्रयत्न राहील. चर्चच्या अंतर्गत भागात रंगरंगोटी चालू असून कामाचा आढावा आपण घेत आहे.