शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पणजीत उद्या नो मोटर झोन; कार्निव्हलनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2019 22:13 IST

शहरातील प्रमुख रस्ता दुपारनंतर वाहतुकीसाठी बंद

पणजी :  राजधानी शहरात किंग मोमोच्या आगमनाने कार्निव्हलची धूम सुरू झाली असून उद्या रविवारी शहरातील १८ जून मार्ग या प्रमुख रस्त्यावर दुपारनंतर 'नो मोटर झोन' आयोजित करून विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत.कार्निव्हल समितीवरील पदाधिकारी तथा नोमोझोचे आयोजन पाहणारे नगरसेवक उदय मडकईकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्या दुपारी ४ वाजता १८ जून रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असून रात्री १० नंतर तो खुला केला जाईल. या काळात या रस्त्यावर सायकल स्पर्धा, कराटे शो, ज्युडो, गरबा तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा घेतल्या जाणार असून संगीत शो देखील होतील. राजधानीतील नेहमी गजबजलेला आणि वर्दळीचा ठरलेला हा रस्ता उद्या कार्निव्हलच्या निमित्ताने पादचाऱ्यांसाठी मुक्त विहारासाठी खुला असेल. या रस्त्यावर कोणतीच वाहतूक होणार नाही. कार्यक्रमाची सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचे मडकईकर यांनी सांगितले. ते म्हणाले की, कार्निव्हलच्या निमित्ताने लोकांना रस्त्यावर मुक्तपणे फिरता यावे, पर्यटकांना शहरातील कार्निव्हलचा आनंद लुटता यावा यासाठी नोमोझोचे आयोजन आहे.आज कार्निव्हल मिरवणुकीला हजारो लोकांनी तसेच पर्यटकाने उपस्थिती लावली. त्यानंतर सायंकाळी येथील चर्च चौकात सांबा स्क्वेअरमध्ये विविध कार्यक्रम झाले. पाश्चात्त्य संगीताच्या तसेच कोकणी कांताराच्या ठेक्यावर तरुणाईची पावले थिरकली. सांबा स्क्वेअरमध्ये कार्यक्रमाच्या वेळी मडकईकर यांनी व्यवस्थापन हाताळले. उशिरापर्यंत या ठिकाणी संगीताचे कार्यक्रम चालू होते. डीजे, पाश्चात्य संगीताने लोकांना रिझवले. या ठिकाणी खाद्य महोत्सवाचे आयोजन केले होते. त्यासाठी स्थानिकांबरोबर देशी-विदेशी पर्यटकांनी उपस्थिती लावून येथील खाद्यसंस्कृतीचा आनंद लुटला. 

टॅग्स :goaगोवा