शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

नवीन प्रादेशिक आराखडा यापुढे नाहीच: विश्वजित राणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 12:17 IST

फक्त झोनिंग होणार, २०२१च्या आरपी घोटाळ्याची चौकशी

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : राज्यात यापुढे आणखी प्रादेशिक आराखडे केले जाणार नाहीत, असे नगरनियोजन मंत्री विश्वजित राणे यांनी काल जाहीर केले आहे. २०२१चा प्रादेशिक आराखडा म्हणजे मोठा घोटाळा होता. राज्यस्तरीय समितीने (एसएलसी) केलेल्या त्या घोटाळ्याशी निगडीत एसएलसीमधील प्रत्येक व्यक्तीची चौकशी केली जाईल, असे राणे यांनी जाहीर केले.

यापुढे नवा प्रादेशिक आराखडा तयार केला जाणार नाही. फक्त झोनिंग केले जाईल. सामान्य लोकांच्या जमिनी एका रात्रीत काहीजणांनी ऑर्चड, नो डेव्हलपमेन्ट वगैरे करून टाकल्या होत्या. त्या मोठ्या घोटाळ्याची पूर्ण चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल.

आपण विधानसभा अधिवेशनात सविस्तर बोलू, असा इशारा मंत्री राणे यांनी दिला. राज्यस्तरीय समितीतील प्रत्येक व्यक्तीची भूमिका तपासून त्यांच्यावर कारवाई केली जाईल. कुणालाही सोडले जाणार नाही, असेही मंत्र्यांनी म्हटले आहे. याविषयी मुख्यमंत्र्यांशी आपली चर्चा झालेली असल्याचे राणे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, मंत्री राणे यांच्या या नव्या भूमिकेमुळे विरोधकांना वादासाठी आता आणखी एक मुद्दा मिळाला आहे. एनजीओंनी अगोदरच टीका सुरू केली आहे. यामुळे सरकारचीही कसोटी लागेल.

- प्रादेशिक आराखड्याच्या नावाने २०१०- २०११च्या काळात लहान जमीनधारकांची सतावणूक करण्यात आली आहे. त्यांची फसवणूक करण्यात आली आहे, असा आरोपही मंत्री राणे यांनी केला आहे.

- प्रादेशिक आराखडा २०२१ मुळे त्रासात सापडलेल्या लोकांना न्याय देण्याचा सरकारचा प्रयत्न राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

- गोव्यातील डोंगर, नद्या, शेते राखण्याची जबाबदारी सरकारची असून, ही जबाबदारी काटेकोरपणे पाळली जाणार आहे. त्यासाठी प्रादेशिक आराखड्याची गरज नाही, असेही ते म्हणाले.

केवळ झोनिंग प्लॅन

प्रादेशिक आराखडा यापुढे फार दीर्घकाळापर्यंत बनविलेच जाणार नाहीत. केवळ विभाग नियोजन (झोनिंग प्लॅन) केले जातील, असे मंत्र्यांनी म्हटले आहे.

विधानसभेत भांडाफोड

प्रादेशिक आराखडा २०२१च्या घोटाळ्यास कोण जबाबदार आहे, याची सविस्तर चौकशी केली जाईल. राज्यस्तरीय समितीतील कोणत्या सदस्याने कोणत्या प्लॅनवर स्वाक्षरी केली आणि का केली? याचा भांडाफोड केला जाणार आहे. येत्या विधानसभा अधिवेशनातच या प्रकरणातील चौकशी अहवाल सादर केला जाणार आहे, असे मंत्र्यांनी सांगितले.

एनजीओंनी घेतला आक्षेप

गोव्याच्या प्रादेशिक आराखड्यात बदल नको, जर बदल करायचेच असतील तर नवा प्रादेशिक आराखडा सर्वांना विश्वासात घेऊनच तयार करावा, अशी मागणी करून राज्यभरातील विविध एनजीओनी सरकारविरोधात दंड थोपटले आहेत.

याबाबत गोव्यातील ४५ विविध एनजीओनी सरकारला निवेदन सादर केले आहे. यात गोवा फाउंडेशन, हेरीटेज अॅक्शन ग्रुप ऑफ गोवा, रेन्बो वॉरियर, गोवा बचाव, खाजन सोसायटी ऑफ गोवा, गोंयची माती, सेव्ह ओल्ड गोवा अॅक्शन कमिटी, गोंयच्या रापणकारांचो एकवट आदी एनजीओचा यात समावेश आहे. यावेळी प्रादेशिक आराखड्याच्या नावाखाली सरकार मनमानी बदल करत असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे.गोवा बचावच्या निमंत्रक सबिना मार्टीन्स म्हणाल्या, की राज्यातील सर्व एनजी एका छताखाली आल्या आहेत. राज्याच्या प्रादेशिक आराखड्यात कुठलाही बदल नको, पर्यावरण संवेदनशील क्षेत्रांमध्ये फेरफार करू नये, असा स्पष्ट इशारा सरकारला दिला आहे. गोव्याचे लोक सर्व पाहत असून, याविरोधात वेळ पडल्यास लोक रस्त्यावर उतरतील. गोवा जमीन विकास आणि इमारत बांधकाम नियमन कायद्यात बदल केले तेव्हा त्याविरोधात आम्ही आक्षेप नोंद केले होते. प्रादेशिक आराखड्याबाबत सुद्धा सरकार तेच करीत आहेत. लोकांना जे हवे ते सरकार करीत नाही.

पर्यावरणाचा -हास केला जात असतानाच दुसरीकडे पर्यावरण दिन साजरा केला जात आहे. लोकांना जे हवे ते सरकारने करावे. प्रादेशिक आराखडा प्रश्नी गप्प बसणार नसल्याचा त्यांनी इशारा दिला.

 

टॅग्स :goaगोवा