शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील पेडामळ-शेल्डेत नऊ वाहनांची तोडफोड; गावात तणावपूर्ण वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 14:18 IST

गावात विविध ठिकाणी घरांसमोर पार्क केलेल्या कारची तोडफोड करण्यात आली आहे.

केपे : पेडामळ-शेल्डे येथे अज्ञाताने नऊ वाहनांची तोडफोड केल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघड झाला. त्यामुळे गावात तणावपूर्ण वातावरण आहे. पहाटेच्या सुमारास नऊ वाहनांची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. मात्र, यात सहा वाहनांचे अधिक नुकसान झाले. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पेडामळ येथील मुस्लिमवाड्यात नऊ वाहनांची तोडफोड करण्याचा प्रकार घडला. यापैकी सहा वाहनांचे जास्त नुकसान झाले आहे. वाहनांची तोडफोड करण्याचा प्रकार पहाटे तीन ते चार यांदरम्यान घडला असावा असा संशय आहे. मात्र, ग्रामस्थांनी याबद्दल कोणावरही संशय व्यक्त केलेला नाही.

गावात विविध ठिकाणी घरांसमोर पार्क केलेल्या कारची तोडफोड करण्यात आली आहे. दगड आणि जड वस्तूंचा वापर करून वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. दगडांचा अथवा जड वस्तूंचा वापर करून काही कारच्या पाठीमागील काचा फोडण्यात आल्या आहेत. स्थानिकांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सकाळी याबाबत केपे पोलिसांना कळवले. केपे पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी सकाळी येऊन वाहनांचा पंचनामा केला. दरम्यान, केपेचे पोलिस निरीक्षक दीपक पेडणेकर म्हणाले की, गावातील दोन गटातील मतभेदांतून हा प्रकार घडला असावा असा संशय आहे. पेडामळ येथील दोन गटांमध्ये वाद आहेत. त्यातून हा प्रकार केला गेला असावा. याबद्दल आमची चौकशी चालू असून लवकरच या प्रकरणाचा उलगडा होईल असा विश्वास पोलिस निरीक्षक पेडणेकर यांनी व्यक्त केला.

टॅग्स :goaगोवाPoliceपोलिस