शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

माझे तिकीट लोक ठरवतील, पक्ष नव्हे! नीलेश काब्राल यांची आक्रमक भूमिका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 11:03 IST

लोकसभेसाठी राज्यभर फिरलो असतो, आता मर्यादा

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: माझे तिकीट लोक ठरवतील पक्ष नव्हे, असे रोखठोक विधान मंत्रिमंडळातून डच्चू दिलेले आमदार नीलेश काब्राल यांनी केले आहे. ते आता हळूहळू आक्रमक बनत असल्याचे एकूणच त्यांच्या विधानांवरुन स्पष्ट होत आहे.

एका मुलाखतीत बोलताना काब्राल म्हणाले की, कुडचडे मतदारसंघात भाजपच्या तिकिटावर मी सुरुवातीला निवडणूक लढवली ती लोकांच्या जीवावरच तेव्हा भाजपसाठी जेमतेम दीडेक वर्षच मी काम केले होते. परंतु लोक माझ्यासोबत आहेत हे पाहूनच पक्षाने त्यावेळी मला उमेदवारी दिलेली.कुडचडेत भाजपमध्ये पर्यायी नेतृत्व तयार करण्याच्या हालचाली चालू असल्याच्या वृत्ताबाबत विचारले असता काब्राल म्हणाले की, कोणीही आले तरी माझे स्थान भक्कम आहे. माझ्यासोबत लोक आहेत. माझी परिस्थिती इतरांसारखी होणार नाही. उलट आता मी मंत्री नाही. त्यामुळे माझ्याकडे भरपूर वेळ आहे. मतदारसंघात माझी पाळेमुळे आणखी मजबूत करण्यासाठी वावरेन.

एका प्रश्नावर काब्राल म्हणाले की, मंत्रिपदावरुन मला काढले तरी मी भाजपसोबतच आहे हे मी मुख्यमंत्र्यांना स्पष्टपणे सांगितले आहे. मंत्री असतो तर लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराच्या प्रचारासाठी गोवाभर फिरलो असतो. आता आमदार म्हणून माझे कार्यक्षेत्र केवळ मतदारसंघापुरते मर्यादित आहे.

बांधकाम खात्यातील भरती प्रकरणी कथित घोटाळ्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, पैसे घेऊन नोकऱ्या देण्याची माझी वृत्ती नाही. राजीनामा दिल्यानंतर हजारो मेसेज राज्यभरातून आले. भरतीबद्दल माझे विरोधकही मला क्लीन चिट देतात. खिस्ती आमदाराला मंत्री बनविण्यासाठी ख्रिस्ती मंत्र्याला वगळणे हे योग्य आहे का?, असा प्रश्न केला असता काब्राल म्हणाले की, असे भाजपत कधी घडले नाही. पायउतार होण्यास सांगितल्यावर मी मुकाट्याने मान्य करणार हे माहीत होते म्हणून कदाचित मला सांगितले असावे. 

काब्राल यांनी आपल्याविरुद्ध कारस्थान शिजल्याचा आरोप केला होता त्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, ज्या पद्धतीने मला थेट केंद्राकडून पायउतार होण्यास सांगितले त्यावरुन गोव्यातूनच माझ्याबाबत कारस्थान शिजले व केंद्रीय नेत्यांचे कान भरल्याचे स्पष्ट होते. मी रोखठोक बोलतो म्हणून माझा काटा काढला असावा. एक लक्षात ठेवा, मी संघाचा नसलो तरी राष्ट्रवाद अंगात भिनलेला आहे. तामनार, दुहेरी रेल्वे मार्ग, कचरा प्रकल्प यामुळे माझी मते कमी झाली. परंतु राष्ट्रीय प्रकल्पांबाबत कधी माघार घेतली नाही.

लोकसभेसाठी मी नाही

लोकसभा उमेदवारी दिली तर स्वीकारणार का?, या प्रश्नावर काब्राल म्हणाले की, मी आमदार म्हणूनच समाधानी आहे. लोकसभेचा वगैरे विचार करत नाही. अजून मी तरुण आहे आणि तळागाळात वावरण्याची माझी तयारी आहे. कुडचडे मतदारसंघाचा मतदार नसतानाही मला लोकांनी निवडून आणले. मी केंद्रात वगैरे जाऊ नये, असे लोकांनाही वाटते. मी माझ्या मतदारसंघातील लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय मी कोणताही निर्णय घेणार नाही.

 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPoliticsराजकारण