शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात एनजीटीकडून पंचायतराज कायद्याचा अनादर, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनी केला आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2017 17:59 IST

राष्ट्रीय हरित लवाद हा घटनेच्या ७३ व्या कलमातील दुरुस्तीचा आदर राखत नसल्याचा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनी केला. पंचायतराज दुरुस्ती १९९४ अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आलेले अधिकार लवादाला मान्य नाहीत असाही त्याचा अर्थ होत असल्याचे ते म्हणाले. 

पणजी: राष्ट्रीय हरित लवाद हा घटनेच्या ७३ व्या कलमातील दुरुस्तीचा आदर राखत नसल्याचा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनी केला. पंचायतराज दुरुस्ती १९९४ अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आलेले अधिकार लवादाला मान्य नाहीत असाही त्याचा अर्थ होत असल्याचे ते म्हणाले. भरती रेषेपासून १०० मीटर अंतरापर्यंत बांधकामाला परवानगी नाकारण्याचा आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिल्यामुळे पारंपरिक मच्छिमार समाजातील लोकांपुढे समस्या निर्माण झाल्या आहेत. हा आदेश मच्छिमारांचे अधिकार नाकारणारा आहे. ७३ व्या घटना दुरुस्तीचा मान न राखणारा आहे असे नाईक यांनी सांगितले. पंचायतराज दुरुस्ती १९९४ अंतर्गत स्थानिक स्वराज  संस्थांना अधिकार देण्यात आले आहेत. बांधकामांना परवानगी देणे किंवा न देणे हे स्थानिक ग्रामपंचायतीचे कार्यक्षेत्र आहे. या संस्थेच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप करून घटना दुरुस्तीचाच अनादर लवादाने करू नये असे त्यांनी सांगितले. माजी केंद्रीय पयावरण मंत्री जयराम  रमेश यांनी गोव्यातील काही किनारी भागात जाऊन पाहणी केली होती. लोकांची समस्या जाणून घेऊन राष्ट्रीय घेऊन ६ जानेवारी २०११ रोजी एक अधिसूचना जारी केली होती. त्यात  मच्छिमारांच्या हिताची काळजी घेण्यात आली होती. तसेच कासव संवर्धन, खारफुटी वाळुच्या टेकड्या, खाण जमिनी यांच्या संवर्धनाचीही तरतूद होती. राज्य सरकारला त्यासाठी कृती आराखडा तयार करण्यास सांगितले होते. परंतु ते काम सरकारने आजपर्यंत करण्यात आले नसल्यामुळे आता लोकांना समस्येला तोंड द्यावे लागत असल्याचे ते म्हणाले. गोव्यात वाहतूकीचा खोळंबा झाला असून प्रशासनाचे लक्ष नसल्याचा आरोप नाईक यांनी केला. वाहतूक सेवा वारंवार बिघडत असल्यामुळे पर्यटकही नाराज होतात. सामान्य माणसाला सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. वरिष्ठ वाहतूक अधिका-यांना वाहतूक नियंत्रण करण्यास सांगण्या ऐवजी तालांव मारण्याचे काम दिले जाते. त्यांना टार्गेट दिले जात असल्यामुळे तालांव देण्याऐवजी दुसरे काम ते करू शकत नाहीत. त्यामुळे वाहतूक व्यवस्था बिघडत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान याच पत्रकार परिषदेत गुजरातच्या आर्चबिशपना निवडणूक आयोगाने नोटीस बजावल्यामुळे कॉंग्रेसचे नेते आल्तीन गोम्स यांनी आयोगाचा निषेध केला.

टॅग्स :goaगोवा