शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात नव्या वर्षाची सुरुवातच 50.90 लाखांच्या ड्रग प्रकरणाने; 177 जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 16:34 IST

सरलेल्या 2019 सालात गोव्यात अंमलीपदार्थाच्या व्यवहाराने अगदी उच्छाद मांडला होता.

 

- सुशांत कुंकळयेकरमडगाव: सरलेल्या 2019 सालात गोव्यात अंमलीपदार्थाच्या व्यवहाराने अगदी उच्छाद मांडला होता. त्यामुळे नव्या 2020 ची सुरुवात कशी होणार याबद्दल संपूर्ण गोवा साशंक होता. मात्र या वर्षाच्या पहिल्याच दिवशी कोरगाव पेडणे येथे तब्बल 50.90 लाखांचा अमली पदार्थ पकडल्याने नव्या वर्षाची सुरुवातच ड्रग्स केसने झाल्याचे स्पष्ट झाले आहे. नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी लाखो देश विदेशी पर्यटक गोव्यात आले असतानाच हा मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थाचा साठा जप्त केला.मानशीवाडा कोरगाव (पेडणे) येथे झालेल्या या कारवाईत पोलिसांनी इफेचुकवू डेव्हीड मडुक्वे या 30 वर्षीय नायजेरियनाला अटक करून त्याच्याकडे असलेला कोकेन जप्त केला. 2019 चे वर्ष संपताना 30 डिसेंबर रोजी मडगाव रेल्वे स्थानकावर केलेल्या कारवाईत आंतोनियो रामोस (42) या पोर्तुगालीन नागरिकाला अटक करून त्याच्याकडून 22.40 लाखांचा कोकेन व चरस जप्त केला होता. गोव्यात मोठय़ा प्रमाणावर अंमली पदार्थाचा व्यवहार चालू असल्याचे 2019 सालाने पुन्हा सिद्ध केले होते. मागच्या वर्षी गोव्यातील वेगवेगळ्या पोलीस स्थानकात अंमली पदार्थ विषयक 155 प्रकरणे नोंद झाली होती. या एकूण कारवाईत 6.23 कोटींचे अंमली पदार्थ जप्त केले होते. तर या वर्षात एकूण 177 जणांना अशा कारवाईत अटक झाली होती. त्यातील धक्कादायक गोष्ट म्हणजे यात 39 स्थानिकांचा समावेश होता. 87 इतर भारतीय नागरिकांचा तर 51 विदेशी नागरिकांचा समावेश होता. नोंद झालेल्या 155 प्रकरणांपैकी 83 प्रकरणे गांजाशी निगडीत होती. तर 72 प्रकरणे इतर सिथेंटीक ड्रग्स संदर्भातील होती.माजी पर्यटन मंत्री आणि बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी गोव्यात अंमली पदार्थाचा सुळसुळाट चालू असल्याचा आरोप करताना काही राजकारणी व पोलिसांची या ड्रग्स व्यावसायिकांशी  मिलीभगत असल्यामुळेच हे व्यवहार खुलेआम चालू आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्यात लक्ष घालण्याची गरज व्यक्त केली. सनबर्नसारख्या संगीत रजनीसाठी गोव्यात येणारे पर्यटकही केवळ अंमली पदार्थाच्या सेवनासाठीच येत असतात. त्यासाठीच ते या महोत्सवावर बारा बारा लाख खर्च करतात. गोव्यात अंमली पदार्थाचा सुळसुळाट असल्यामुळेच चांगले पर्यटक गोव्यात येत नाहीत, असाही आरोप त्यांनी केला. 2019 साली ज्या 51 विदेशी नागरिकांना अटक करण्यात आली त्यात 32 नायजेरियन, 11 रशियन, घाना व ऑस्ट्रियाचे प्रत्येकी दोन तर इटली, केनिया, नेपाळ व पोर्तुगालच्या एका नागरिकाचा समावेश आहे. 2020 सालाच्या पहिल्याच दिवशी अटक करण्यात आलेला विदेशी नागरिकही नायजेरियाचाच आहे.

टॅग्स :goaगोवा