शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

नेदरलँडच्या युवतीवर वेटरने केला अतिप्रसंग; संशयितास अटक, दोघांवर चाकूने वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 08:22 IST

बलात्काराचा आणि जिवे मारण्याचा प्रयत्न त्याच रिसॉर्टमध्ये काम करणाऱ्या एका बिगर गोमंतकीय कर्मचाऱ्याकडून करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्क पेडणे: गोव्यात पर्यटक म्हणून आलेल्या नेदरलँडच्या युवतीवर बलात्काराचा आणि जिवे मारण्याचा प्रयत्न त्याच रिसॉर्टमध्ये काम करणाऱ्या एका बिगर गोमंतकीय कर्मचाऱ्याकडून करण्यात आला. तिचा आरडाओरडा ऐकून शेजारील एक गृहस्थ धावून आल्यामुळे तिचा जीव वाचला. या प्रकरणी पेडणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी माहितीनुसार, गुरुवारी ही घटना उघडकीस आली. अतिप्रसंग करणारी रिसॉर्टमधील व्यक्ती शेजारच्या रूममधील व्यक्ती आल्याने युवतीला सोडून पळून गेली. मात्र नंतर तो धारधार चाकू घेऊन पुन्हा त्या युवतीच्या रूममध्ये आला व बचावासाठी आलेल्या स्थानिक व्यक्तीसह त्या युवतीवर वार केले आणि तिथून पळ काढला. घटनेनंतर दोघांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. 

त्यानंतर पेडण्याचे पोलीस निरीक्षक दत्ताराम राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विवेक हळर्णकर, हरीश वायंगणकर, तीर्थराज म्हामल, पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा वेळीप, सागर खोर्जुवेकर, प्रेमनाथ सावळ - देसाई व रजत गावडे यांचे पथक तैनात करण्यात आले. त्यानंतर काही वेळातच संशयित उमेश चंद्र (वय २७, रा. त्यागी रोड, डेहराडून) याला अटक करण्यात आली. उमेश रिसॉर्टमध्ये बार वेटर म्हणून काम करत होता. यावेळी गुन्ह्यासाठी वापरलेला चाकू जप्त करण्यात आला आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :goaगोवाCrime Newsगुन्हेगारी