शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

ना भिंती ना छप्पर, ना दार ना खिडक्या; तरीही ग्रामसेवकाच्या कृपेने मिळाला घर नंबर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 14:01 IST

सचिवाच्या मनमानीचा निषेध म्हणून पंच सदस्याने दिला राजीनामा

अजय बुवा

दक्षिण गोवा - फोंडा बोरी ग्रामपंचायत क्षेत्रात एक अनोखा प्रकार उजेडात आला असून, काँक्रीटच्या पट्ट्या तीन बाजूने उभ्या करून केलेला एका आडोशाला पंचायत सचिवाने थेट घर क्रमांक दिला आहे.सचिवांच्या मनमानी व बेकायदेशीर कृत्याचा निषेध म्हणून सदर प्रभागातील पंच सदस्य विनय पारपती यांनी चक्क राजीनामा दिल्याची घटना यामुळे घडली आहे. सविस्तर वृत्तानुसार बोरी बायथेखोल सर्कल जवळ एका इसमाने फक्त तीन बाजूनी मोजून 12 काँक्रीटच्या पट्ट्या उभ्या करून एक आडोसा उभा केला आहे. त्याला ना छप्पर ना दरवाजा, ना भिंती ना खिडक्या .घर म्हणताना ह्या सगळ्या गोष्टी असायला हव्यात. सदरच्या आडोशाला घर कसे म्हणावे हा प्रश्न प्रत्येकाला  पडलेला आहे. परंतू सचिवांना त्याचे काहीच पडून गेले नाही. प्रत्येक घरात असलेल्या एका लहानशा बाथरूम एवढे क्षेत्रफळ असलेले हे बांधकाम असून, सदरची फाईल पंचायत सचिवा जवळ येताच  त्या जागेची पाहणी न करताच थेट घर क्रमांक देऊन टाकला आहे. सदर प्रभागाचे पंच सदस्य विनय पारपती यांच्या लक्षात ही गोष्ट येताच त्यांनी पंच सदस्य सतीश बोरकर व  सुनील बोरकर यांच्यासह सदर बांधकामाची पाहणी केली असता त्यांना तेथे घर म्हणतात असे काहीच आढळून आले नाही. पंचायत सचिवांनी  घर क्रमांक देताना सदरची गोष्ट अगोदर पंच सदस्यांच्या निदर्शनास आणून द्यायला पाहिजे होती. परंतु सचिवाने कुणालाच विश्वासात न घेता सदर बांधकामाला घर क्रमांक दिला आहे असा आरोप पंच सदस्य करत आहेत. 

सोमवारी विनय पारपती यांनी पत्रकारांना त्या ठिकाणी बोलावून सदर प्रकारावर उजेड टाकला. सदरच्या आडोशाला घर क्रमांक दिल्याचे पाहून पत्रकार सुध्दा आश्चर्यचकित झाले. यावेळी बोलताना विनय पारपती म्हणाले की ' पंचायत सचिव रुपेश हळर्णकर हे मनमानी कारभार करत आहेत. तीन बाजूने नुसत्या लहानशा काँक्रीटच्या पट्ट्या उभ्या करून जो आडोसा निर्माण केला आहे, त्याला घर क्रमांक देण्याअगोदर पंचायत सचिवांनी पाहणी करायला हवी होती. पंच सदस्यांना विश्वासात घ्यायला पाहिजे होते. आज सदरच्या आडोशाला घर म्हणून क्रमांक दिल्याने लोक आमच्या कार्यपद्धतीवर शंका घेत आहेत. ह्या घर क्रमांक संदर्भात पंचायत सचिव आमचे काहीच न ऐकत असल्याचे लक्षात येताच निषेध म्हणून मी थेट पंच सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. सरकारने सदर पंच सदस्य सचिवावर कारवाई करावी. पंचायत संचालक कार्यालयातील लोकांनी येऊन घराच्या नावाखाली जे काम उभे केले आहे, त्याची पाहणी करावी व नंतरच याला घर म्हणतात की आणखीन काय म्हणतात ते ठरवावे.

टॅग्स :goaगोवाgram panchayatग्राम पंचायतHomeसुंदर गृहनियोजन