शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

‘नंदादीप’ वाचवण्याची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2018 16:44 IST

म्हापसा : राज्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य असलेली ‘नंदादीप’ अर्थात म्हापसा अर्बन बँक आॅफ  गोवाचा नंदादीप विझण्यापासून वाचवण्याचे प्रयत्न होण्याची गरज आहे. त्यासाठी उद्या दि. २९ रोजी होणाऱ्या  बँकेच्या आमसभेत भागभांडवल उभे करुन बँकेला पुन्हा आर्थिक उभारी देण्याची गरज आहे. म्हापसा शहरातील प्रमुख व्यापारी तसेच उद्योजकांनी म्हापसा अर्बन बँकेची स्थापना १९६६ साली ...

म्हापसा : राज्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य असलेली ‘नंदादीप’ अर्थात म्हापसा अर्बन बँक आॅफ  गोवाचा नंदादीप विझण्यापासून वाचवण्याचे प्रयत्न होण्याची गरज आहे. त्यासाठी उद्या दि. २९ रोजी होणाऱ्या बँकेच्या आमसभेत भागभांडवल उभे करुन बँकेला पुन्हा आर्थिक उभारी देण्याची गरज आहे. 

म्हापसा शहरातील प्रमुख व्यापारी तसेच उद्योजकांनी म्हापसा अर्बन बँकेची स्थापना १९६६ साली केली. उत्तर गोव्यातील पहिली सहकारी बँक स्थापन करण्याचा मान म्हापसावासीयांना लाभला.  राज्यातील बहुराज्य बँक होणाचा मान मिळवलेल्या या बँकेची आर्थिक स्थिती गंभीर होत गेल्यानंतर रिझर्व्ह बँकेने म्हापसा अर्बनावर सुमारे साडेतीन वर्षापूर्वी आर्थिक निर्बंध लागू केले. पार्श्वभूमीवर उद्या म्हापसा अर्बन बँकेची आमसभा होत आहे. गुरुदास नाटेकर यांच्या अध्यक्षतेखालील विद्यमान संचालक मंडळाने राजीनामे सादर केले असले तरी ते अद्याप स्वीकारण्यात आले नसल्याने नाटेकर यांच्या अध्यक्षतेखालील होणाºया या सभेला संचालक मंडळाला भागधारकांच्या रोषाला, आक्रमणाला सामोरे जावे लागणार आहे. त्यातून उद्याची सभा एकूण वादळी ठरण्याची संभावना आहे. असे असले तरी बँकेला पुन्हा वाचवण्यासाठी या सभेतून प्रयत्न तसेच उपाय योजना होणे गरजेचे आहे. 

राज्यातील सहकारी क्षेत्रातल्या चार महत्त्वाच्या बँकांची आर्थिक अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. अनुत्पादीत कर्ज वाढल्याने ही गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. त्यात म्हापसा अर्बनचा समावेश आहे. असे असले तरी म्हापसा अर्बन बँकेची स्थिती इतर बँकांच्या तुलनेत चांगली असल्याचा दावा संचालक मंडळाकडून करण्यात आलेला. बँक सुस्थितीत आणण्यासाठी भागभांडवलाची गरज व्यक्त करुन त्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आलेले. त्यासाठी संचालक मंडळाने सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला राजीनामे सादर केलेले होते. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने काही प्रमाणावर निर्बंध शिथील करताना विविध प्रकारची बिले स्वीकारण्याची अनुमती बँकेला दिली होती. मात्र खारेधारकाला आपल्या खात्यावरुन फक्त १ हजार रुपये काढण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. ते सुद्धा निर्बंध लागू असेपर्यंत.  

मागील काही दिवसापासून संचालक मंडळ तसेच भागधारकांत एकमेकांवर आरोप प्रति आरोप करण्याचे सत्र सुरु झाले आहे. बँकेच्या काही भागधारकांनी एकत्रित येऊन बॅँकेच्या सरव्यवस्थापकांना विविध पत्रे सादर करून त्यावर स्पष्टीकरण मागितले आहे. यात मंजूर करण्यात आलेले कर्ज, आमसभेत चर्चेसाठी घेण्यात येणारे ठराव, जुलै २०१५ नंतर बॅँकेतून काढण्यात आलेली रक्कम, एक रकमी कर्ज मंजुरीची विस्तारीत माहिती, बॅँकेच्या आर्थिक स्थितीसंबंधी माहिती पुरविण्याची मागणी केलेल्या पत्रातून करण्यात आली आहे. सदर माहिती आमसभेवेळी देण्यात यावी असेही त्यात नमूद करण्यात आले आहे. या पत्रांचे पडसाद सभेत पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

गेल्या वर्षी घेण्यात आलेली सभा सुद्धा बरीच वादळी ठरली होती. त्यावेळी संचालक मंडळाकडून बँकेच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव तसेच बहुराज्य बँकेचे पतसंस्थेत रुपांतर करण्याचा प्रस्ताव सुद्धा सभेसमोर मांडला होता. विलीनीकरणाचा प्रस्ताव प्रत्यक्षात उतरु शकला नव्हता तर पतसंस्थेत रुपांतराला कडाडून विरोध करण्यात आलेला. एकंदरीत सभा वादग्रस्त होणार असली तरी उभारीच्या दृष्टीने सुद्धा चर्चा होणे गरजेचे आहे. 

टॅग्स :goaगोवाbankबँक