शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात लोकसभा निवडणुकीत यंदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्वच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 21:08 IST

गोव्यात लोकसभा निवडणुकीवेळी यंदा राष्ट्रवादी काँग्रेसचे काही अस्तित्वच नाही अशी स्थिती आली आहे. महाराष्ट्रात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यात युती आहे. पण, गोव्यात काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार देखील न करता दोन्ही जागांवर आपले संभाव्य उमेदवार जवळजवळ ठरविले आहेत.

पणजी : गोव्यात लोकसभा निवडणुकीवेळी यंदा राष्ट्रवादी काँग्रेसचे काही अस्तित्वच नाही अशी स्थिती आली आहे. महाराष्ट्रात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यात युती आहे. पण, गोव्यात काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार देखील न करता दोन्ही जागांवर आपले संभाव्य उमेदवार जवळजवळ ठरविले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा काँग्रेसने विचार करावा, अशी स्थितीही गोव्यात राहिलेली नाही.लोकसभेच्या दोन जागांपैकी एक जागा काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडावी, अशी मागणी राष्ट्रवादीने केलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे गोवा प्रभारी प्रफुल्ल पटेल यांची सोमवारी फोनवरून राष्ट्रवादीचे गोवा प्रदेशाध्यक्ष जुङो फिलिप  डिसोझा यांच्याशी चर्चा झाली. आम्हाला काँग्रेसने एक जागा सोडायला हवी, असा मुद्दा जुङो फिलिप यांनी मांडला. पटेल यांनी आपण दोन दिवसांत राहुल गांधी यांना भेटणार आहोत एवढेच जुङो फिलिप यांना सांगितले. एकंदरीत प्रफुल्ल पटेल यांनाही गोव्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढविण्यात किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटना बळकट करण्यात रस राहिलेला नाही. 2017 च्या निवडणुकीवेळीच काँग्रेसने गोव्यात राष्ट्रवादीला गुड बाय केले व एकही जागा सोडली नाही. 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीवेळीही राष्ट्रवादीला काँग्रेसने लोकसभेची जागा सोडली नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2017 च्या निवडणुकीवेळी मोठी फुट पडली. त्यानंतर अजुनही पक्ष सावरलेला नाही. 2017 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा मोठा पराभव झाला. चर्चिल आलेमाव हे एकमेव उमेदवार राष्ट्रवादीच्या तिकीटावर जरी निवडून आले तरी त्यांनी पक्षासोबत आपला मोठा संबंध ठेवलेला नाही.2009 सालच्या लोकसभा निवडणुकीवेळी मात्र राष्ट्रवादीचे बळ गोव्यात मोठे होते. त्यावेळी काँग्रेसने उत्तर गोव्याची जागा राष्ट्रवादीला सोडली होती. राष्ट्रवादीतर्फे उत्तर गोव्यातून लढताना जितेंद्र देशप्रभू फक्त सहा-सात हजार मतांच्या फरकाने हरले होते. 2004 साली स्वर्गीय विल्फ्रेड डिसोझा हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर उत्तर गोव्यात लढले होते. त्यावेळी 88 हजार मते राष्ट्रवादीने प्राप्त केली होती.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक