शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

मराठी ऐकून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराची कानात बोटं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2019 20:03 IST

भाषांतर करण्याची राष्ट्रवादीच्या आमदाराची मागणी

पणजी : गोवा विधानसभेत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे (मगोप) आमदार सुदिन ढवळीकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे अभिनंदन करताना मराठीतून भाषण सुरू केल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकमेव आमदार असलेले चर्चिल आलेमाव यांनी कानांत बोटे घातली. ‘सभापती महाशय काहीच समजत नाही, कोंकणीतून भाषांतर व्हावे,’ असे त्यांनी सांगितले. साखळी-गोवा येथील एका संस्थेकडून मुख्यमंत्र्यांना साखळी भूषण पुरस्कार जाहीर केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी आमदार ढवळीकर सभागृहात उभे राहिले होते. ‘सभापती महाशय, मला सांगायला अत्यंत आनंद होत आहे..’ म्हणून ढवळीकर यांनी बोलायला सुरुवात केली. त्यावेळी चर्चिल आलेमाव  जाग्यावरून उभे राहिले. त्यांनी कानांत बोटे घातली. काहीच समजत नाही, असे सांगून त्यांनी सभापतींकडे याचे कोंकणीतून भाषांतर पाहिजे अशी मागणी केली. त्यावर सभापतींनी त्यांना सध्या तुम्ही बसा, तुम्हाला नंतर मी कोंकणीतून सांगतो असे सांगितले. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार प्रतापसिंग राणे यांनी ‘म्हाज्या मोगाच्या मित्रा, प्रमोद सावंत हांका परबी’ (माझो प्रिय मित्र, प्रमोद सावंत यांना शुभेच्छा) असे त्यांना कोंकणीतून भाषांतर करून सांगितले. चर्चिल यांना मराठी येत नाही ही खरी गोष्ट नाही, असेदेखील राणे यांनी सुनावले. याच सभागृहात चर्चिल यांनी ‘ये रे ये रे पावसा’ ही कविता म्हणून दाखविली होती, याची आठवणदेखील राणेंनी करून दिली. त्यावर ही कविता आपल्याला केवळ तोंडपाठ आहे; परंतु त्याचा अर्थ कळत नाही, असे त्यांनी सांगितले. यावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यापुढे भाषांतर करणारे दुभाषी नेमण्याचे आश्वासनही सभागृहात दिले. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसgoaगोवा