शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

13 हजार 431 मतदारांची नावे गोव्याच्या यादीतून रद्द, एकूण मतदारसंख्या आता 11 लाख 19 हजार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2018 23:22 IST

राज्यातील मतदारांची नवी यादी जाहीर झाली आहे. त्यानुसार प्रथमच यावेळी एकूण 13 हजार 431 लोकांनी गोव्याच्या मतदार यादीतून स्वत:हून आपली नावे रद्द करून घेतली आहेत.

पणजी : राज्यातील मतदारांची नवी यादी जाहीर झाली आहे. त्यानुसार प्रथमच यावेळी एकूण 13 हजार 431 लोकांनी गोव्याच्या मतदार यादीतून स्वत:हून आपली नावे रद्द करून घेतली आहेत. नव्या 8 हजार 816 मतदारांची भर पडली असून राज्यात एकूण मतदार संख्या आता 11 लाख 19 हजार 777 झाली आहे.यापूर्वी झालेल्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीवेळी राज्यात मतदारांची एकूण संख्या 11 लाख 10 हजार 961 होती. त्यात 5 लाख 46 हजार पुरुष व 5 लाख 64 हजार 470 महिला मतदार होत्या. आता महिला मतदारांचे एकूण प्रमाण 5 लाख 69 हजार 884 झाले आहे. पुरुष मतदारांचे प्रमाण महिलांपेक्षा जास्तच राहिले आहे. पुरुष मतदारांची संख्या 5 लाख 49 हजार झाली आहे. म्हणजेच फक्त तीन हजार नव्या पुरुष मतदारांची भर पडली आहे. या उलट महिला मतदारांची संख्या पाच हजारांनी वाढली आहे.जे गोमंतकीय विदेशात जाऊन तिथेच स्थायिक होतात, त्यांची नावे मतदार यादीतून निवडणूक आयोगाकडून काढून टाकली जाते. तथापि, यावेळी 14 हजार 384 गोमंतकीयांनी स्वत:हून निवडणूक आयोगाकडे अर्ज केले व मतदार यादीतून नावे रद्द करण्याची विनंती केली. या 14 हजारांपैकी 13 हजार 431 अर्ज निवडणूक आयोगाने स्वीकारले व नावे मतदार यादीतून रद्द केली. मतदार यादीतून आपले नाव रद्द करावे म्हणून ताळगाव मतदारसंघातून सर्वात जास्त म्हणजे 614 अर्ज आले. नावेली मतदारसंघातून 128 अर्ज आले. नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी फोंडा मतदारसंघातून सर्वात जास्त म्हणजे 889 अर्ज आले.सर्वात कमी म्हणजे 357 अर्ज कळंगुट मतदारसंघातून आले. सर्वाधिक मतदार संख्या वास्को मतदारसंघात आहे. तिथे एकूण 35 हजार 922 मतदार संख्या आहे. सर्वात कमी मतदारसंख्या सांतआंद्रे मतदारसंघात झाली आहे. तिथे 20 हजार 844 मतदार झाले आहेत. मुरगाव मतदारसंघात महिला मतदारांची संख्या सर्वात कमी म्हणजे 10 हजार 443 आहे. नवी मतदारसंख्या कुठ्ठाळीत सर्वाधिक वाढली. तिथे 660 मतदारांची भर पडली. ही माहिती मुख्य निवडणूक अधिका-यांच्या कार्यालयातून प्राप्त झाली.

टॅग्स :goaगोवा