शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सेक्स स्कॅण्डलसाठी केला माझा आवाज क्लोन; ॲाडिओ क्लिपवर मंत्री माविन गुदिन्होंचे भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 11:54 IST

पणजी : गाजलेल्या कथित सेक्स स्कॅण्डल प्रकरणानंतर वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी आरोप केला की, माझा आवाज क्लोन करून बनावट ...

पणजी : गाजलेल्या कथित सेक्स स्कॅण्डल प्रकरणानंतर वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी आरोप केला की, माझा आवाज क्लोन करून बनावट ॲाडिओ क्लिप तयार करण्याचा प्रयत्न काहीजण करत आहेत. एक एनजीओने तसेच पोलिस अधिकाऱ्यांनी मला याबाबत सतर्क केले असून, या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन चौकशी करण्याची गरज आहे.

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा अ. भा. काँग्रेस कार्यकारिणीवरील कायम निमंत्रित गिरीश चोडणकर यांनी कथित सेक्स स्कॅण्डल उघडकीस आणल्यानंतर मंत्री माविन यांच्या कार्यालयातून पोलिस तक्रार करण्यात आली होती. त्यात मंत्री माविन यांची प्रतिमा मलीन करण्यासाठीच हा सर्व प्रकार चालू असल्याचे म्हटले होते.

माविन म्हणाले की, मुळात जी गोष्ट घडलेलीच नाही ती घडली आहे, असा दावा करणे संतापजनक आहे. मला कळत नाही किती खालच्या स्तरावर जाऊन दुसऱ्याची अप्रतिष्ठा केली जात आहे. राजकीय हेतूने बदनामी करण्याचा हा प्रयत्न आहे. गेली ४५ वर्षे मी राजकारणात आहे, असे आरोप कधीच झाले नाहीत. या वयात मला लक्ष्य केले जात आहे.

मुख्यमंत्र्यांना भेटणारमला मुळापासून चौकशी हवीय. ते वृत्त कोणी तयार केले. कोणाचे संबंध आहेत, हे पोलिसांनी शोधावे.  ज्याच्याविरुध्द तक्रार केली आहे, संशय व्यक्त केला त्याला पोलिसांनी चौकशीसाठी आणावे. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना भेटून चौकशीला गती देण्याची मागणी करणार आहे.

क्लिपसाठी धडपडमाझा आवाज क्लोन करुन बोगस ॲाडिओ क्लिप तयार करण्याचा प्रयत्न आता चालू आहे. एका टेक्निशियनने हे करण्यास नकार दिल्यावर विरोधकांनी दुसऱ्याला गाठले असून, त्याने क्लिप तयार करण्याची तयारी दाखविल्याची माहिती मला मिळाली आहे.

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेस